World Cup 2023 Points Table : बांगलादेशला तर पराभूत केलं पण पाकिस्तान उपांत्य फेरीत जाणार का? जाणून घ्या
World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीची चुरस रंगतदार वळणावर आहे. भारतीय संघ सोडला तर सात संघांमध्ये चुरस आहे. पण पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकतो का? चला जाणून घेऊयात
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघांची विजयी घोडदौड सुरु आहे. भारताने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे सहा पैकी सहा सामन्यात विजय मिळवट टीम इंडियाचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित आहे. पण सात संघांमध्ये चुरस उपांत्य फेरीसाठी चुरस आहे. इंग्लंड आणि बांगलादेश या स्पर्धेत आता फक्त सामने खेळण्यापुरता उरले आहेत. सातव्या टप्प्यात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगला. हा सामना पाकिस्तानने 7 गडी राखून जिंकला आणि उपांत्य फेरीची आशा कायम ठेवल्या आहेत. गुणतालिकेत पाकिस्तानने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. पण पाकिस्तानला टॉप 4 संघात स्थान मिळेल का? भारत पाकिस्तान सामना उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पाहायला मिळेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. चला जाणून घेऊयात पाकिस्तान उपांत्य फेरी कशी गाठू शकतो.
पाकिस्तानचे साखळी फेरीतील फक्त दोन सामने उरले आहेत. सध्या पाकिस्तान 6 गुण आणि -0.024 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे. टॉप 4 मध्ये जागा मिळवायची तर दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचं गणि कोलमडणं गरजेचं आहे. त्यामुळे पाकिस्तानला उर्वरित दोन सामने तर जिंकावेच लागतील. पण दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया पराभूत व्हावे यासाठी नवस करावा लागेल.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं समीकरण
- पाकिस्तानचा पुढचे दोन्ही सामने जिंकावेच लागतील. पहिला सामना न्यूझीलंडशी आहे. 4 नोव्हेंबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर इंग्लंडसोबत 11 नोव्हेंबरला दुसरा सामना आहे. हे दोन्ही सामने जिंकणं गरजेच आहे. यामुळे पाकिस्तानचे 10 गुण होतील.
- दक्षिण अफ्रिकेने उर्वरित तिन्ही सामने गमवाले तर 10 गुणच राहतील. अशा वेळी पाकिस्तान चांगल्या नेट रनरेटसह पुढे जाऊ शकतो. मग उर्वरित दोन सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल.
- न्यूझीलंडचे सध्या 3 सामने उरले आहेत. तीन पैकी तीन सामने गमावले तर पाकिस्तानला सहज संधी मिळेल. पण न्यूझीलंडने एक जरी सामना जिंकला तर मात्र कठीण होईल. तिथे नेट रनरेटचा हिशेब येईल. पण दोन सामने जिंकले तर प्रश्नच येत नाही 12 गुणांसह न्यूझीलंड टॉप 4 मध्ये राहील.
- ऑस्ट्रेलियाचं गणित देखील न्यूझीलंडसारखंच आहे. एक सामना जिंकला तर क्वॉलिफाय करेल. पण नेट रनरेटचा प्रश्न येईल. पण दोन्ही सामने जिंकले तर मात्र टॉप 4 कायम राहील.
- पाकिस्तानला अफगाणिस्तानचं देखील टेन्शन आहे. अफगाणिस्तानने तीन मोठे उलटफेर केले आहेत. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात चमत्कार केला तर मात्र पाकिस्तानचं काय खरं नाही.