World Cup 2023 Points Table : भारत विजयी चौकारसह गुणतालिकेत दुसऱ्याच स्थानी, पण उपांत्य फेरीची वाट झाली सोपी
World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने बांगलादेशला पराभूत करत सलग चौथा विजय नोंदवला आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्ताननंतर बांगलादेशला पराभवाची धूळ चारली आहे. पण गुणतालिकेत अव्वल स्थान गाठता आलं नाही.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आता साखळी फेरीचे सामने रंगतदार वळणावर येत आहेत. भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. पण गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागणार आहे. कारण बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत करण्यास भारतीय संघ अपयशी ठरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांचे समसमान गुण आहेत. पण नेट रनरेटच्या आधारावर न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. तर बांगलादेशची एका क्रमाकांनी घसरण झाली आहे. भारताने सलग 4 विजय मिळवल्याने उपांत्य फेरीची वाट सोपी झाली आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी साखळी फेरीतील 9 पैकी 7 सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे आणखी तीन सामने जिंकताच टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे.
गुणतालिकेचं गणित वाचा
न्यूझीलंडचा संघ 4 पैकी 4 सामने जिंकत 8 गुण आणि +1.923 नेट रनरेटसह अव्वल स्थानी आहे. तर भारत 4 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह +1.659 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केलं असतं तर अव्वल स्थान गाठता आलं असतं. पण तसं झालं नाही.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
गुणतालिकेतील अव्वल स्थानाचं गणित 22 ऑक्टोबरला सुटणार आहे. कारण भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे विजयी संघाचे आपसूक 10 गुण होतील आणि अव्वल स्थान गाठता येणार आहे. सध्या नेट रनरेटने न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी आहे. आता दोन दिवसांनी हे चित्र स्पष्ट होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध भारत
बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 8 गडी गमवून 256 धावा केल्या आणि विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 3 गडी गमवून 41.3 षटकात पूर्ण केलं. या विजयात विराट कोहली, शुबमन गिल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा मोलाचा वाटा राहिला.
दोन्ही संघांचे खेळाडू
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.