World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करत न्यूझीलंडने गाठलं अव्वल स्थान, पाहा काय बदल झाला?

World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सामन्यांचे निकाल येताच गुणतालिकेत बदल दिसून येतो. टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांची धडपड सुरु आहे. पण नेट रनरेटही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करत न्यूझीलंडने गाठलं अव्वल स्थान, पाहा काय बदल झाला?
World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडला जबरदस्त फायदा, भारताने अव्वल स्थान गमावलं Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 9:38 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करत अफगाणिस्तानने कमाल केली होती. मात्र तशीच कामगिरी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात करता आली नाही. उलट 149 धावांनी पराभव झाल्याने न्यूझीलंडला जबरदस्त फायदा झाला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत केल्यानंतर या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र अपेक्षित कामगिरी करण्यात अफगाणिस्तानला अपयश आलं. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 50 षटकात 6 गडी गमवून 288 धावा केल्या आणि विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं. अफगाणिस्तानचा संघ 34.4 षटकात सर्वबाद 139 धावा करू शकला. अफगाणिस्तानचा 149 धावा आणि 15.2 षटकं राखून पराभव केला.

गुणतालिकेत असा झाला बदल

न्यूझीलंडने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यात अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने फायदा झाला आहे. गुणतालिकेत 8 गुण आणि +1.923 नेट रनरेटसह अव्वल स्थान गाठलं आहे. तर भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. अफगाणिस्तानने या स्पर्धेत 4 सामने खेळले असून तीन सामन्यात अपयशाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे थेट नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

भारत विरुद्ध बांगलादेश सामना

भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 ऑक्टोबरला सामना होणार आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशचा मोठ्या फरकाने पराभव केला तर नक्कीच अव्वल स्थान गाठण्यास मदत होणार आहे. चौथ्या टप्प्यात उपांत्य फेरीच्या दृष्टीने बरंच चित्र स्पष्ट होणार आहे. तळाशी असलेल्या संघांना उपांत्य फेरीसाठी सर्वच सामने जिंकावे लागणार आहे. म्हणजेच करो या मरोची लढाई येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.