World Cup 2023 Points Table | न्यूझीलंड पुन्हा अव्वल स्थानी, भारताचं भवितव्य पाकिस्तानच्या सामन्यावर अवलंबून
World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत तिसऱ्या टप्प्यातील सामने सुरु झाले आहेत. पहिला सामना न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 8 गडी आणि 43 चेंडू राखून पराभव केला. जाणून घेऊयात गुणतालिकेतील उलटफेर
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा प्रत्येक सामन्यांतर रंगतदार वळणावर येत आहे. अजूनतरी या स्पर्धेत मोठा उलटफेर होईल असा सामना झालेला नाही. दुबळ्या संघांची बाजू कमकुवत असून बलाढ्य संघ सहजरित्या पराभूत करत आहेत. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेदरलँडची अशी स्थिती आहे. तर ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन सामने गमावल्याने कमबॅकसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील सामने सुरु झाले असून न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला. या सामन्यात अपेक्षेप्रमाणे निकाल लागला. न्यूझीलंडने बांगलादेशचा 8 गडी आमि 43 चेंडू राखून पराभव केला. त्यामुळे गुणतालिकेत टॉप 4 संघात वर खाली झालं.
न्यूझीलंडने वनडे वर्ल्डकपमधील सुरुवातीचे तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडची विजयी घोडदौड सुरुच आहे. न्यूझीलंडचा 3 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह +1.604 नेट रनरेट आहे. दक्षिण आफ्रिकेने 2 पैकी 2 सामने जिंकत 4 गुणांसह +2.360 नेट रनरेट आहे. भारताचा 2 पैकी 2 सामने जिंकत 4 गुणांसह +1.500 नेट रनरेट आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर असून 2 पैकी 2 सामने जिंकत 4 गुणांसह +0.927 नेट रनरेट आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यानंतर यात मोठा फरक दिसून येणार आहे. कारण एका संघाला दोन गुणासह नेटरनरेटमध्ये फायदा होईल आणि थेट पहिलं स्थान काबीज करता येईल. पाचव्या स्थानावर इंग्लंड असून एक सामना गमवल्याने 2 गुण आहेत. त्या खालोखाल बांगलादेशचा संघ 2 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
श्रीलंका, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांना या स्पर्धेत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे शून्य गुणांसह नेट रनरेटच्या आधारावर संघ वर खाली आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धा रॉबिन राउंड पद्धतीने होत असून गुणतालिकेतील टॉप चार संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. सध्याच्या स्थितीत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत आणि पाकिस्तान हे उपांत्य फेरीसाठी पात्र आहेत. पण ही स्पर्धा जसजशी पुढे सरकेल तसं हे गणित बदलेल. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.