World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानमुळे पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! पाहा गुणातालिकेत काय फरक पडला ते
World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने दुसरा धक्का दिला आहे. इंग्लंडनंतर आता पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे गुणतालिकेत मोठा फरक पडला आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत तिसरा मोठा उलटफेर झाला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडनंतर पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आहे. यापूर्वी नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. त्यामुळे दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी दिग्गज संघांना पराभूत केल्याने क्रीडा जगतात जोरदार चर्चा रंगली आहे. आयसीसी स्पर्धेत अफगाणिस्तानने दोन दिग्गज संघांना पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 50 षटकात 7 गडी गमवून 282 धावा केल्या आणि विजयासाठी 283 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान अफगाणिस्तानने 8 गडी आणि 6 चेंडू राखून पूर्ण केलं. यासह पाकिस्तानची उपांत्य फेरीची वाट आणखी बिकट झाली आहे. पाकिस्तानने स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकत आव्हान कायम ठेवलं होतं. पण त्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
उपांत्य फेरीच्या शर्यतील भारत आणि न्यूझीलंड यांचं जवळपास निश्चित झालं आहे असंच म्हणावं लागेल. पण उर्वरित दोन संघांसाठी जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात काँटे की टक्कर असेल. पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर नेट रनरेटवरही लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.
वनडे वर्ल्डकप गुणतालिका
गुणतालिकेत भारत 5 पैकी पाच सामने जिंकत अव्वल स्थानी आहे. 10 गुण आणि +1.353 च्या नेट रनरेटने पहिल्या स्थानावर आहे. त्या खालोखाल न्यूझीलंडचा संघ आहे. पाच पैकी चार सामने जिंकत 8 गुणआणि +1.481 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 6 गुणांसह तिसऱ्या स्थानार आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान प्रत्येकी 4 गुणांसह अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
स्पर्धेतील हा पाचवा टप्पा असून भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. त्यामुळे उर्वरित संघ कशी कामगिरी करतात. यावरून आठवड्याच्या शेवटी गुणतालिकेचं चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे. पाकिस्तानला अजूनही न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या संघांचं आव्हान असणार आहे.