World Cup 2023 Points Table : टीम इंडियाची अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तानची वाट केली सोपी

World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा कहर पाहायला मिळतोय. सलग सात सामने जिंकत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने नेट रनरेटही जबरदस्त झाला आहे.

World Cup 2023 Points Table : टीम इंडियाची अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तानची वाट केली सोपी
World Cup 2023 Points Table : टीम इंडियाचं ठरलं, श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात, तर पाकिस्तानला दिली अशी संधीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 8:42 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी सात सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने 14 गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे. तसेच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. उपांत्य फेरीत अधिकृतरित्या जागा मिळवणारा भारत हा पहिला संघ आहे. दुसरीकडे, उपांत्य फेरीसाठी सहा संघांमध्ये चुरस असणार आहे. श्रीलंकेला संधी आहे पण भारताने मोठ्या फरकाने पराभूत केल्याने नेट रनरेटवर जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे बांगलादेश, इंग्लंडनंतर श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे असंच म्हणावं लागेल. आता उपांत्य फेरीसाठी दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्ताना, अफगाणिस्तान आणि नेदरलँड यांच्यात चुरस आहे. सहा पैकी तीन संघांना उपांत्य फेरीत संधी मिळणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईल.

भारताने 7 पैकी सात सामन्यात विजय मिळवून 14 गुण आणि नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं आहे. तसेचं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दक्षिण अफ्रिका 6 सामन्यात विजय मिळवून 12 गुण आणि +2.290 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 8 गुण आणि +0.970 नेट रनरेटसह तिसऱ्या, न्यूझीलंड 8 गुण आणि +0.484 नेट रनरेटसह चौथ्या, पाकिस्तान 6 गुण आणि -0.024 नेट रनरेटसह पाचव्या, अफगाणिस्तान 6 गुण आणि -0.275 नेट रनरेटसह, नेदरलँड 4 गुण आणि -1.277 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

भारताने श्रीलंकेला पराभूत केल्याने पाकिस्तानची उपांत्य फेरीची संधी वाढली आहे. उपांत्य फेरीच्या वाटेतील श्रीलंकेचा अडसर दूर झाला आहे. तर अफगाणिस्तान आणि नेदरलँड सामन्यातील निकालानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरीचं गणित सोपं होईल. पाकिस्तानला दोन सामने खेळायचे असून न्यूझीलंड आणि इंग्लंडशी होणार आहे. या दोन सामन्यात विजय मिळवला तर नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत जागा मिळू शकते.

भारत विरुद्ध श्रीलंका

भारताने 50 षटकात 8 गडी गमवून 357 धावा केल्या. श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचं आव्हान दिलं. मात्र श्रीलंकेचा संपूर्ण संघ 55 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात मोहम्मद शमीन 18 धावा देत 5 गडी बाद केले. तर मोहम्मद सिराजने 3 विकेट घेतले. तर जडेजा आणि जसप्रीत बुमराह याने प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताकडून शुबमन गिलने 92 धावा, विराट कोहलीने 88, तर श्रेयस अय्यरने 82 धावा केल्या.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.