World Cup 2023 : हार्दिक पांड्याबाबत रोहित शर्मा याने केला मोठा खुलासा, म्हणाला; ” त्याच्या पायाला…”

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा विजयी रथ आणखी एक पाऊल पुढे सरकला आहे. भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. पण अष्टपैलू आणि टीम इंडियाचा महत्त्वाचा शिलेदार हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने चिंता वाढली आहे. याबाबत रोहित शर्मा याने खुलासा केला आहे.

World Cup 2023 : हार्दिक पांड्याबाबत रोहित शर्मा याने केला मोठा खुलासा, म्हणाला;  त्याच्या पायाला...
World Cup 2023 : हार्दिक पांड्या पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? रोहित शर्मा म्हणाला...
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 10:27 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताची अपेक्षेप्रमाणे विजयी घोडदौड सुरु आहे. रॉबिन राउंड पद्धतीत प्रत्येक संघाला 9 सामने खेळायचे आहेत. त्यात भारताने 4 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी 7 विजय आवश्यक आहे. अर्थात टीम इंडियाने पाच पैकी 3 सामन्यात विजय मिळवला की उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होणार आहे. पण हे सर्व गणित असताना भारताच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला तीन चेंडू टाकून षटक संपवावं लागलं. त्यानंतर तो मैदानात दिसलाच नाही. इतकंच काय तर त्याच्या षटकातील उरलेले तीन चेंडू विराट कोहलीने पूर्ण केले. त्यामुळे हार्दिक पांड्याला नेमकं काय झालं आहे याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? असा प्रश्नही क्रीडाप्रेमींना सतावत आहे. अखेर यावर कर्णधार रोहित शर्मा याने पडदा टाकला आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

हार्दिक पांड्याची दुखापत पाहता त्याचं स्कॅनिंग करण्यात आलं. जेणेकरून दुखापत किती गंभीर आहे याचा अंदाज बांधला जाईल. हार्दिक हा गोलंदाजीसोबत फलंदाजीतही माहीर आहे. त्यामुळे त्याचं न खेळणं टीम इंडियाला चांगलंच महागात पडू शकतं. पण याबाबत रोहित शर्मा याने स्पष्टीकरण दिलं आहे. “त्याच्या डावाला पायाला दुखापत झाली आहे. पण जास्त चिंता करण्याचं कारण नाही. फक्त तिथे सुज आहे. उद्या सकाळी त्याबाबत बघू आणि नंतरचा प्लान ठरवू.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्या याची दुखापत गंभीर नसावी अशीच प्रार्थना क्रीडाप्रेमी करत आहे. कारण टीम इंडियाला मोक्याची क्षणी विजय मिळवून देण्यात हार्दिकचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्याची जागा भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. टीम इंडियाचा पुढचा सामना 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हा सामन्यात टीम इंडियापुढे मोठं आव्हान असेल. दुसरीकडे, न्यूझीलंडने भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये अनेकदा अडचण निर्माण केली आहे, हे देखील विसरून चालणार नाही.

हार्दिक पांड्याची दुखापत जास्त असेल तर कोणाला संधी मिळेल असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मोहम्मद शमी की आर अश्विन हे दोन पर्याय ठरतील. त्यामुळे रोहित शर्मापुढे आता मोठा पेच असणार आहे. आर अश्विनला संधी दिली तर वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात एक मोहरा कमी पडेल. दुसरीकडे मोहम्मद शमी घेतलं तर फलंदाजीचा प्रश्न उभा राहील.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.