SA vs SL : तिहेरी शतकांसह दक्षिण आफ्रिकेचं 428 धावांचं आव्हान, श्रीलंकन गोलंदाजांना फोड फोड फोडलं

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं धावांचा डोंगर रचला आहे. 50 षटकात 5 गडी गमवून 428 धावा केल्या आणि 429 धावांचं आव्हान दिलं आहे. आता इतकं मोठं आव्हान श्रीलंका कसं पेलणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

SA vs SL : तिहेरी शतकांसह दक्षिण आफ्रिकेचं 428 धावांचं आव्हान, श्रीलंकन गोलंदाजांना फोड फोड फोडलं
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 6:32 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं मोठा धमाका केला आहे. श्रीलंकेन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. दश्रिण आफ्रिकेकडून तिघांनी शतकी खेळी करत इतक्या 428 धावांचा डोंगर रचला आहे. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय सपशेल चुकल्याचं दिसू आलं. क्विंटन डीकॉक, रस्सी व्हॅन दर डुस्सेन आणि एडन मार्करम यांनी शतकी खेळी केली. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हा एक इतिहास आहे. वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये पहिल्यांदाच एका संघाकडू तीन शतकी खेळी पाहायला मिळाल्या आहेत. इतकंच नाही तर मार्करम याने वनडे वर्ल्डकप इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावलं.

क्विंटन डिकॉकने 84 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. तर रस्सी व्हॅन दर डुसेन याने 110 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. तर एडन मार्करम याने 54 चेंडूत 106 धावांची स्फोटक खेळी केली. यात 14 चौकार आमि 3 षटकारांचा समावेश आहे. श्रीलंकेकडून कसुन रजिथा, दिलशान मधुशंका, मथिशा पथिराना आणि दुनिथ वेलालागे यांनी सर्वात महागडा स्पेल टाकला.

वनडे वर्ल्डकप इतिहासातील हा सर्वात मोठा स्कोअर आहे. श्रीलंकेला कमी धावसंख्येवर रोखण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आलं तर गुणतालिकेत मोठा बदल घडणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेला दोन गुणांसह रनरेटमध्ये फायदा होणार आहे. यामुळे उपांत्य फेरीचा रस्ता मोकळा होण्यास मदत होईल. वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला 5 वेळा पराभूत केलं आहे. तर श्रीलंकेने एकदा पराभूत केलं आहे.

वनडे वर्ल्डकप इतिहासातील हा सर्वात मोठा स्कोअर आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. 2015 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात 50 षटकात 7 गडी गमवून 417 धावा केल्या होत्या. तर भारताने 2007 मध्ये बरमुडा विरुद्ध 413 धावांचा डोंगर रचला होता.

दोन्ही संघांचे खेळाडू

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): कुसल परेरा, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका, कसून राजितहा.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.