SA vs SL | श्रीलंकाची जोरदार झुंज अपयशी, दक्षिण आफ्रिका टीमची विजयी सलामी
Icc World Cup 2023 South Africa vs Sri Lanka Match Result | दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी या सामन्यात अनेक रेकॉर्ड आणि रेकॉर्ड ब्रेक केले. या सामन्यात दोन्ही संघाच्यां खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. मात्र दक्षिण आफ्रिकेने मैदान मारलं.
नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी स्पर्धेतील पहिल्या डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिला सामना बांगलादेशने जिंकला. बांगलादेशने अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका आमनेसामने होते. हा सामना दक्षिण आफ्रिकेने 102 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकासमोर 429 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेला पूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. मात्र श्रीलंकेनेही हार न मानता झुंज दिली. श्रीलंका 44.5 ओव्हरमध्ये 326 धावांवर ऑलआऊट झाली. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे विजयी सुरुवात केली.
श्रीलंकाकडून चरिथा असलंका, कॅप्टन दासून शनाका आणि विकेटकीपर बॅट्समन कुसल मेंडिस या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेच्या आशा कायम राहिल्या. चरिथा याने सर्वाधिक 79 धावा केल्या. कुसल मेंडीस याने 42 बॉलमध्ये 76 धावांची तुफानी खेळी केली. तर कॅप्टन दासून शनाका याने 68 धावांचं योगदान दिलं. कसून राजिथा याने 33 धावा जोडल्या. धनंजंय डी सिल्वा 11 धावांवर माघारी परतला. पाथुम निसांका आणि दुनिथ वेल्लालागे हे दोघे आले तसेच भोपळा न फोडता गेले. कुसल परेरा याने 7 आणि मथीशा पथिराणा याने 5 धावा केल्या. तर दिलशान मधुशंका 4 धावांवर नाबाद राहिला.
तर दक्षिण आफ्रिकेकडून बॉलिंग टाकलेल्या पाचही गोलंदाजांनी विकेट घेतल्या जेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मार्को जान्सेन, कगिसो रबाडा आणि केशव महाराज या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर लुंगी एन्गिडी याच्या खात्यात 1 विकेट गेली.
दरम्यान त्याआधी दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आणि एडन मारक्रम या तिघांनी वैयक्तिक शतकं ठोकली. डी कॉक याने 100, ड्युसेन याने 108 आणि मारक्रमने 106 धावा केल्या. या तिघांच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 428 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून दिलशान मधुशंका याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.
दक्षिण आफ्रिका टीमची सॉल्लिड सुरुवात
Tough battle out there today, South Africa claimed the victory. We’ll bounce back stronger!#LankanLions #CWC23 #SLvSA pic.twitter.com/gbOt7PJHqt
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 7, 2023
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि कगिसो रबाडा.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेल्लालागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका आणि कसून राजिथा.