World Cup 2023 आधी ‘या ‘मॅचविनर खेळाडूची संघात एन्ट्री, रोहित शर्मा याचं मोठं वक्तव्य!

Rohit Sharma : वर्ल्ड कपसाठी संघ बांधणी करताना टीम मॅनेजमेंटची दुखापती खेळाडूंमुळे मोठी गोची होणार आहे. कारण वर्ल्ड कपच्या तोंडावर सरावाची गरज असताना खेळाडू दुखापतीमधून सावरत आहेत. अशातच एका खेळाडूबाबत रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलंय.

World Cup 2023 आधी 'या 'मॅचविनर खेळाडूची संघात एन्ट्री, रोहित शर्मा याचं मोठं वक्तव्य!
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 3:50 PM

मुंबई : टीम इंडियासाठी आशिया कप आणि वर्ल्ड कप 2023 या टुर्नामेंट महत्त्वाच्या आहेत. याआधी टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू जखमी असल्याने दुखती नस झाली आहे. कारण या मोठ्या स्पर्धांना काहीच दिवस शिल्लक असून खेळाडू अजुनही पूर्णपणे फिट झालेले नाहीत. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आता आयर्लंड दौऱ्यावर कर्णधारपदाच्या जबाबदारीसह कमबॅक करणार आहे. अशातच कर्णधार रोहित शर्मा याने एका खेळाडूबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा:-

रोहितने ज्या खेळाडूबाबत अपडेट दिलं आहे तो खेळाडू श्रेयस अय्यर आहे. वर्ल्ड कपपर्यंत श्रेयस अय्यर हा फिट होणार नाही त्यामुळे तो वर्ल्ड कप खेळणार नाही असं, काही अहवालांमध्ये समोर आलं आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना, श्रेयस अय्यर फिट होऊन पुन्हा मैदानावर दिसण्याच्या मार्गावर असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

रोहित शर्मा याच्या या वक्तव्यावरून अय्यर वर्ल्ड कपसाठी उपलब्ध असू शकतो की नाही हे काही निश्तित झालेलं नाही. बीसीसीआयने प्रसिद्ध कृष्णा, के. एल. राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसबाबत अपडेट दिलं होतं. त्यामध्ये दिसलं होतं की हे खेळाडू आता फिट होऊन परत एकदा कमबॅक करण्याच्या मार्गावर आहेत. मात्र यामधील अधिकृतपणे फक्त बुमराहबाबत सांगण्यात आलं असून इतर कोणत्याही खेळाडूंबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, वर्ल्ड कपसाठी संघ बांधणी करताना टीम मॅनेजमेंटची दुखापती खेळाडूंमुळे मोठी गोची होणार आहे. कारण वर्ल्ड कपच्या तोंडावर सरावाची गरज असताना खेळाडू दुखापतीमधून सावरत आहेत. जेव्हा फिट होतील तेव्हा थेट टुर्नामेंटमध्ये उतरवणं संघासाठी घातक ठरू शकतं.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.