SL vs NZ : श्रीलंकेचं न्यूझीलंडसमोर 172 धावांचं आव्हान, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं

उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी महत्त्वाची लढाई श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची नजर आहे. कारण या सामन्यावर उपांत्य फेरीचं गणित अवलंबून आहे.

SL vs NZ : श्रीलंकेचं न्यूझीलंडसमोर 172 धावांचं आव्हान, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं
SL vs NZ :न्यूझीलंडकडून श्रीलंकन फलंदाजांची दाणादाण, विजयासाठी 172 धावांचं लक्ष्यImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 5:24 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील तीन संघांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. श्रीलंकेचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं गणित या सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे. खासकरून पाकिस्तानला तर श्रीलंका जिंकली तर फायदा होणार आहे. पण श्रीलंकेची स्थिती पाहून आता पाकिस्तानला घाम फुटणार हे मात्र नक्की..कारण श्रीलंकेनं न्यूझीलंडसमोर अवघ्या 172 धावांचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता न्यूझीलंड हा सामना जिंकेल असंच क्रीडाप्रेमींना वाटत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किवी गोलंदाजांनी हा निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिलं. श्रीलंकेला 171 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान मिळालं आहे. न्यूझीलंडने हा सामना जिंकला तर थेट उपांत्य फेरी गाठणार आहे. कारण नेट रनरेटच्या रेसमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान खूपच पाठी आहेत. त्यामुळे हे अंतर कापणं वाटतं तितकं सोपं नाही.

श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि महीश पथिराना यांनी चांगली फलंदाजी केली. या व्यतिरिक्त एकही खेळाडू तग धरू शकला नाही. श्रीलंकेचे सहा खेळाडू तर एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. कुसल परेरा याने 28 चेंडूत 51 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 3, टिम साऊथीने 1, लॉकी फर्ग्युसनने 2, मिचेल सँटनरने 2 आणि रचिन रविंद्रने 2 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टॉम लॅथम (विकेटकीपर), टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशनका.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....