SL vs AFG : श्रीलंकेचं अफगाणिस्तानसमोर 241 विजयासाठी धावांचं आव्हान

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 30 वा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय उपांत्य फेरीचं गणित स्पष्ट करणार आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तान समोर विजयासाठी 241 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता हे आव्हान अफगाणिस्तान गाठतं का? याकडे लक्ष लागून आहे.

SL vs AFG : श्रीलंकेचं अफगाणिस्तानसमोर 241 विजयासाठी धावांचं आव्हान
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 6:00 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे दोन संघ आमनेसामने आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच श्रीलंकेला 240 धावांवर रोखलं. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर कोणत्याही खेळाडू मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाथुम निस्सांका हा 46 धावा करून तंबूत परतला. या व्यतिरिक्त एकही खेळाडू चमकदार कामगिरी करू शकला नाही. श्रीलंकेने 240 धावा केल्या असून अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 241 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता हे आव्हान अफगाणिस्तानचा संघ गाठतो की नाही याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. श्रीलंकेचा संघ 4 गुण आणि -0.205 नेट रनरेटसह पाचव्या, तर अफगाणिस्तानचा संघ 4 गुण आणि -0.969 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्ंवाचा आहे.

श्रीलंकेचा डाव

पाथुम निसंका आणि दिमुथ करुणारत्ने ही जोडी मैदानात उतरली. पण संघांची धावसंख्या 22 असताना करुणारत्ने बाद झाला. फझलहक फारुकीने त्याला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर पाथुम आणि कुसलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अझमतुल्लाहने त्याला बाद करत श्रीलंकेच्या धावांना ब्रेक लावला. त्यानंतर कुसल मेंडिस 39 धावा करून तंबूत परतला. सदीरा समारविक्रमा काही खास करू शकला नाही. तो 22 धावा करून बाद झाला. धनंजय डिसिल्वा 14, अँजोलो मॅथ्युज 23, दुशमंथा थीक्षाना 1, महीश थीक्षाना 29, कसुन राजिथा 5 धावा करून बाद झाले.

अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकीने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर मुजीब उर रहमान याने 2, तर राशीद खान आणि मोहम्मद नबीने प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (कर्णधार/विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मधुशंका

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.