World Cup 2023 : जगातील श्रीमंत क्रिकेट मंडळ निसर्गामुळे उघडं, श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना…. धक्कादायक व्हिडीओ समोर!

ODI World Cup 2023 AUS vs SL : वर्ल्ड कप सुरू असताना श्रीलंका ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये एक मोठा अपघात होता होता राहिला. यामुळे सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयवर निसर्गामुळे जगासमोर मान खाली खालावी लागली.

World Cup 2023 : जगातील श्रीमंत क्रिकेट मंडळ निसर्गामुळे उघडं, श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना.... धक्कादायक व्हिडीओ समोर!
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 3:21 PM

मुंबई :  वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकत झकास सुरूवात केली आहे. पाचवेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रिलिया त्यानंतर अफगाणिस्तान आणि शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला हरवत विजयी घोडदौड काय ठेवली आहे. वर्ल्ड कपचे एकूण सामन्यांंपैकी रोज एक-एक सामने होत आहेत. अशातच सोमवारी झालेल्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये मोठा अपघात टळला. दैव बलवत्तर म्हणून अनेक चाहत्यांचे प्राण वाचले.

नेमकं काय घडलं होतं जाणून घ्या

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यामध्ये पावसाने चांगलाच खोडा घातला होता. हलकासा पाऊस आणि वादळ आल्याने सामना काहीवेळ थांबवला गेला होता. लखनऊच्या स्टेडियममध्ये मोठा अपघात टळला. वादळ आल्याने स्टेडियमच्या वरच्या भागावरील काही होर्डिंग स्टँडमध्ये पडले. नशिबाने तिथल्या प्रेक्षकांन प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

होर्डिंग खाली पडल्यानंतर त्या ठिकाणी बसलेल्या प्रेक्षकांना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ निसर्गासमोर उघडं पडलं. भारताकडे यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद असल्यामुळे  बीसीसीआयने जंगी तयारी केली आहे. मात्र परतीच्या पावसामुळे सामन्यात व्यत्यय येत असल्याचं दिसत आहे.

श्रीलंका-ऑस्ट्रेलियामधील सामन्यामध्ये कांगारूंनी विजय मिळवला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील कांगरूंचा हा पहिलाच विजय असून श्रीलंका संघाला अद्यापही विजयाचं खातं उघडलं नाही.  श्रीलंका संघाला प्रथम फलंदाजी करताना 209 धावाच करता आल्या. यामध्ये पाथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी 125 धावांची सलामी दिली होती. मात्र त्यानंतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करण्यात यश आलं नाही.

दरम्यान, भारतीय संघाचा चौथा सामना बांगलादेश संघासोबत आहे. हा सामना पुण्यामध्ये पार पडला जाणार आहे. या सामन्यासाठी रोहित सेना सज्ज झाली असून आपला विजयरथ कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ पूर्ण प्रयत्न करताना दिसेल.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.