Icc World Cup 2023 मध्ये विराट कोहली याला सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

Icc World Cup 2023 Team India | विराट कोहली याने आतापर्यंत टीम इंडियाला अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. या दरम्यान विराटने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आता विराटला असाच एक वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

Icc World Cup 2023 मध्ये विराट कोहली याला सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 1:09 AM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी तयारी पू्र्ण झाली आहे. एकूण 10 सहभागी संघ भारतात दाखल झाले आहेत. वर्ल्ड कपसाठी प्रत्येक संघाने नवी जर्सी लॉन्च केली आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपसाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. टीम इंडिया आपला पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची रनमशीन अर्थात विराट कोहली याला मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. विराटकडे सचिनच्या सर्वाधिक वनडे शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावावर 49 वनडे शतकं आहेत. तर विराट कोहली याच्या नावावर 47 एकदिवसीय शतकं आहेत. त्यामुळे विराटने 3 शतकं लगावल्यास तो वनडेत सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू ठरेल.

विराटला 9 सामन्यांचा वेळ

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 हा रॉबिन राउंड पद्धतीने पार पडणार आहे. म्हणजे प्रत्येक टीम उर्वरित 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 असे एकूण 9 सामने खेळणार आहेत. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, साऊथ अफ्रिका आणि नेदरलँड्स या 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळणार आहेत. त्यामुळे विराटला या 9 पैकी 3 सामन्यात 3 शतकं ठोकत सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करु शकतो. तर 2 शतक केल्यास सचिनच्या विक्रमाची बरोबरी साधू शकतो. त्यामुळे आता विराट सचिनचा महाविक्रम वर्ल्ड कपमध्येच मोडीत काढतो की त्यानंतर याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.