World Cup 2023 | टीम इंडियाच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर;या 2 संघाविरुद्ध लढणार!

World Cup 2023 Team India | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरपासून खेळणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला 2 सामने खेळायचे आहेत.

World Cup 2023 | टीम इंडियाच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर;या 2 संघाविरुद्ध लढणार!
वर्ल्ड कप जिंकणं पाकिस्तानसाठी महत्त्वाचं असून तेच उद्दिष्ट असल्याचंही शादाब खानने म्हटलं आहे. शादाबच्या वक्तव्याची क्रिकेट वर्तुळाच एकच चर्चा आहे.
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 8:42 PM

मुंबई | आयसीसीने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल. या वर्ल्ड कपमधील पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकूण 10 संघ एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. रॉबिन राउंड पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीनंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता शहरात पहिली आणि दुसरी सेमी फायनल मॅच खेळवण्यात येणार आहे. तर 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची अंतिम सामन्याने सांगता होईल.

टीम इंडिया 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप मोहिमेला श्रीगणेशा करणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडिया 2 संघांविरुद्ध खेळणार आहे. या 2 सामन्यांसाठी वेळापत्रक जाहीर झालं आहे. वर्ल्ड कप सामन्यांचं आयोजन हे भारतातील एकूण 13 शहरांमध्ये करण्यात आलंय. मात्र 10 शहरांमध्ये साखळी आणि अन्य सामने खेळवण्यात येतील. तर उर्वरित 3 शहरात सराव सामने खेळवण्यात येतील. तिरुवनंतरपूरम, गुवाहाटी आणि हैदराबादमध्ये सराव सामने खेळवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्टार स्पोर्ट्सनुसार, टीम इंडिया एकूण 2 सराव सामने खेळणार आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि क्वालिफायर 1 संघाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.

या वर्ल्ड कपमधील 10 पैकी 8 संघ ठरले आहेत. तर उर्वरित 2 संघ हे आयसीसी क्वालिफायरमधून पात्र ठरणार आहेत. या 2 जागांसाठी 10 संघांमध्ये रस्सीखेच सुरु आहेत. यातून जिंकणाऱ्या पहिल्या संघाविरुद्ध टीम इंडिया सराव सामना खेळणार आहे.

टीम इंडियाच्या सराव सामन्याचं वेळापत्रक

पहिला सामना, 30 सप्टेंबर, गुवाहाटी, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड.

दुसरा सामना, 3 ऑक्टोबर, तिरुवनंतरपूरम, टीम इंडिया विरुद्ध क्वालिफायर 1.

दरम्यान बीसीसीआयकडून अद्याप सराव सामन्यांबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

टीम इंडियाच्या साखळी फेरीचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई.

टीम इंडिया विरुद्ध अफगानिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान – 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश – 19 ऑक्टोबर, पुणे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाळा.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनऊ.

टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 2 नोव्हेंबर, मुंबई.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण अफ्रीका – 5 नोव्हेंबर, कोलकाता.

टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 11 नोव्हेंबर, बंगळुरु.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.