AUS vs BAN : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामन्यात कोणते खेळाडू ठरतील बेस्ट, जाणून घ्या सविस्तर
वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीतील संघांचं निश्चित झालं आहे. असं असलं तरी साखळी फेरीतील शेवटचे तीन सामने शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 43 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात होत आहे. बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे हा केवळ औपचारिक सामना असेल. पण चॅम्पियन ट्रॉफी 2025 दृष्टीने हा सामना बांगलादेशला जिंकावा लागले अन्यथा चॅम्पियन ट्रॉफीचं गणित चुकू शकतं. त्यामुळे बांगलादेश विजयासह वर्ल्डकप स्पर्धेचा शेवट करण्याच्या हेतूने उतरेल. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 21 वेळा वनडे सामन्यात आमनेसामने आले आहेत. यात 19 वेळा ऑस्ट्रेलियाने, तर 1 वेळा बांगलादेशने विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित ठरला आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये तीन वेळा आमनेसामने आले आणि तिन्ही वेळा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. या सामन्यातील बेस्ट 11 खेळाडूंची निवड करायची असेल. तर तुम्हाला काही अंशी मदत होऊ शकते.
पिच रिपोर्ट
ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. हे मैदान फलंदाजीसाठी जबरदस्त आहे. या खेळपट्टीवर आरामात 300 पार धावसंख्या होईल. गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी डोकेदुखी ठरेल. त्यामुळे या सामन्यात जो संघ चांगली फलंदाजी करेल तो विजय खेचून आणेल.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू मॅक्सवेलकडे नजर असले. कारण अफगाणिस्तान विरुद्धचा पराभव झालेला सामना मॅक्सवेलने परत खेचून आणला. त्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंना पुन्हा एकदा मॅक्सवेलचं आव्हान असेल. पण डेविड वॉर्नर,मिचेल मॉर्श टिकले तर मग कठीण होईल. बांगलादेशकडून रहीम आणि मेहदी हसन मिराज चांगली करू शकतात.
ड्रीम इलेव्हन
- कर्णधार- ग्लेन मॅक्सवेल
- उपकर्णधार- डेविड वार्नर
- विकेटकीपर-जोश इंगलिस
- अष्टपैलू-मार्कस स्टोइनिश, मेहदी हसन मिराज
- फलंदाज- मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, नजमुल हसन शान्तो
- गोलंदाज- शोरिफुल इस्लाम, मिचेल स्टार्क, एडम जम्पा
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
बांगलादेशची संभाव्य इलेव्हन: तान्झिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराज, तन्जीद हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि शोरीफुल इस्लाम.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य इलेव्हन: ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.