World Cup 2023 : न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात हे 11 खेळाडू ठरतील बेस्ट, जाणून घ्या सर्वकाही
World Cup 2023, NZ vs AFG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 16 वा सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यात कोणते खेळाडू बेस्ट ठरतील. तसेच प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्टबाबत जाणून घ्या.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तान हा सर्वात मोठा उलटफेर करणारा संघ ठरला आहे. तर न्यूझीलंडने सलग तीन विजय मिळवत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 14 वा सामना आता न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत करत सहावं स्थान गाठलं आहे. अफगाणिस्तनने इंग्लंडला धोबीपछाड दिल्याने आता सर्वच संघ सावध झाले आहेत. अफगाणिस्तानला कमी लेखून चालणार नाही. आता अफगाणिस्तान न्यूझीलंडचा विजयी रथ रोखते की, न्यूझीलंड बाजी मारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पिच रिपोर्ट
एमए चिदंबरम स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातील सीम आणि स्विग करण्यास मदत होईल. तसेच स्लो डिलिव्हरी फलंदाजांना अडचणीत आणू शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणं स्वीकारलं जाईल. पहिल्यांदा फलंदाजी करताना 230 ते 240 पर्यंत धावा होऊ शकतात.
कोणते खेळाडू ठरतील बेस्ट
डेव्हॉन कॉनव्हे, मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री हे खेळाडू कर्णधारपदासाठी योग्य ठरतील. रचिन रवींद्र, राशीद खान आणि डेरिल मिचेल टॉप पिकअप खेळाडू ठरतील. तर रहमनुल्लाह गुरबाज, अझमतुल्लाह ओमरझाई, मुजीब उर रहमान हे बजेट खेळाडू ठरतील. तर मार्क चॅम्पमॅन आणि नजिबुल्लाह झार्दन यांचा फॉर्म पाहता संघात स्थान देणं ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे.
बेस्ट टीम अशी असू शकते
डेव्हॉन कॉनव्हे (कर्णधार), रहमनुल्लाह गुरबाज, डेरिल मिचेल, हशमतुल्लाह शाहिदी, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर (उपकर्णधार), अझमतुल्लाह ओमरझाई, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, मुजीब उर रहमान, राशीद खान
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
न्युझीलंड : डेव्हॉन कॉनव्हे, मिचेल सँटनर, डीजे मिशेल, रचिन रवींद्र, एमएस चॅपमन, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, एलएच फर्ग्युसन, एमजे हेन्री, ट्रेंट बोल्ट, ईश सोढी.
अफगाणिस्तान: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रहमानउल्ला गुरबाज, आयक्रम अखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक.