AUS vs NZ : ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सामन्यात हा ठरला टर्निंग पॉइंट, असं झालं नसतं तर किवींचा विजय होता पक्का!

World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अटीतटीचा सामना झाला. न्यूझीलंडला अवघ्या 5 धावांनी पराभव सहन करावा. हातात 1 विकेट असूनही विजयी धावा गाठता आल्या नाही. चला जाणून घेऊयात न्यूझीलंडचं नेमका कुठे फटका बसला तो...

AUS vs NZ : ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सामन्यात हा ठरला टर्निंग पॉइंट, असं झालं नसतं तर किवींचा विजय होता पक्का!
AUS vs NZ : ऑस्ट्रेलियाच्या या बाबी न्यूझीलंडवर पडल्या भारी, जाणून घ्या अवघ्या 5 पराभव होण्याची कारणंImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 8:51 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप इतिहासातील सर्वात रोमांचक असा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. दोन्ही संघांनी धावांचा डोंगर रचला. पण न्यूझीलंडला अवघ्या पाच धावांनी पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडकडे 1 विकेट असूनही विजयी धावांचा पाठलाग करणं कठीण झालं. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मैदानात आरामात धावांचा पाठलाग होईल याचा अंदाच ऑस्ट्रेलिायला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. 49.2 षटकात सर्वबाद 388 धावा केल्या आणि विजयासाठी 389 धावांचं आव्हान दिलं. न्यूझीलंडचा संघ 50 षटकात 9 गडी गमवून 383 धावा करू शकला. त्यामुळे इतक्या कमी अंतराने पराभव झाल्याने नेमका कुठे फटका बसला ते जाणून घेऊयात..

शेवटच्या षटकात नेमकं काय झालं?

मिचेल स्टार्क याने टाकलेलं शेवटचं षटक टर्निंग पॉइंट ठरला. या षटकात न्यूझीलंडला 6 चेंडूत 19 धावांची आवश्यकता होती. जेम्स नीशम आणि ट्रेंट बोल्ट खेळत होते. पहिल्या चेंडूला स्टार्क सामोरा गेला आणि 1 धाव काढून नीशमला स्ट्राईक दिली. 51 धावांवर असलेल्या नीशमला काही करून मोठी फटकेबाजी करणं आवश्यक होतं. स्टार्कने वाइड टाकला आणि चौकार आला. त्यामुळे 5 चेंडूत 13 अशी स्थिती आली. त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा आल्या.

तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्याने 3 चेंडूत 9 धावा अशी स्थिती झाली. पण हा चौकारच असता ग्लेन मॅक्सवेल जबरदस्त उडी घेत चौकार अडवला. चौथ्या चेंडूवर 2 धावा आल्या. हा चेंडूही चौकार असता पण मार्नस लाबुशेन उडी घेत चौकार अडवला आणि दोन धावा वाचवल्या. त्यामुळे 2 चेंडूत 7 धावा अशी स्थिती आली. पाचव्या चेंडूवर नीशमने चेंडू मारला खरा पण दोन धावा घेताना धावचीत झाला.

एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता होती. स्ट्राइकवर लोकी फर्ग्यसन होता. पण मोठा शॉट्स मारता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी विजय झाला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे गुण सारखे आहे. 8 गुण आणि +1.232 नेट रनरेटसह न्यूझीलंड तिसऱ्या, 8 गुण आणि +0.970 नेट रनरेटसह ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे.

'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.