IND vs BAN | विराट कोहलीसाठी बांगलादेशचा हा खेळाडू ठरणार ‘काळ’, तुम्हीच पाहा आकडेवारी!
Ind vs ban world cup 2023 : भारत आणि बांगलादेशमध्ये पुण्यात सामना पार पडणार आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी बांगलादेश संघाचा एक खेळाडू धोकादायक ठरू शकतो, पाहा कोण आहे तो खेळाडू?
पुणे : वर्ल्ड कप 2023मध्ये भारत-बांगलादेश संघ एकमेकांना भिडणार असून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सामना पार पडणार आहे. रोहित सेना या सामन्यामध्ये बांगलादेशचा पराभव करत विजयी चौकार मारण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तर बांगलादेश उलटफेर करण्यासाठी उत्सुक असेल, या सामन्यामध्ये स्टार खेळाडू किंग कोहली याच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दमदार फलंदाजी करत फॉर्ममध्ये असल्याचं विरोधी संघांना दाखवून दिलंय. मात्र कोहलीसाठी बांगलादेशचा एक खेळाडू डोकेदुखी ठरतो. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये किंगसाठी मोठं चॅलेंज असणार आहे.
विराटसाठी डोकेदुखी ठरणारा कोण?
आजच्या सामन्यामध्ये विराट कोहलीसाठी बांगलादेशचा एक स्टार खेळाडू मोठे डोकेदुखी ठरू शकतो. विराट यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये असल्याचं दिसलं आहे मात्र बांगलादेशचा खेळाडू कायम त्याला अडचणीत आणतो. पुण्याच्या स्टेडियममध्ये आज परत एकदा कोहली आणि तो खेळाडू आमने सामने येणार आहेत. आज कोण बाजी मारतं याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.
आतापर्यंतची आकडेवारी पाहता विराट कोहली याला 14 सामन्यांमध्ये पाचवेळा आऊट केलं आहे. वर्ल्ड कपमध्येही विराट परत एकदा शिकार ठरणार तर नाही ना? अशी भीती चाहत्यांना सतावू लागली आहे. नेमका तो खेळाडू आहे तरी कोण जो विराटसाठी काळ ठरत आहे. तर हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शाकिब अल हसन आहे.
विराट कोहलीसाठी जरी तो धोकादायक ठरत असला तरी शाकिब आजच्या सामन्यामध्ये खेळणार आहे की नाही याबाबत शंका आहे. कारण न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यामध्ये शाकिबला दुखापत झालेली होती. त्यामुळे तो सराव शिबिरामध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या खेळण्याचं काही नक्की नाही.
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ -:
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(WK), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर. अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार. यादव