World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानच्याच माजी खेळाडूने काढली बाबरसेनेची इज्जत, म्हणाला…

Waqar Younis On Pakistan Team: वर्ल्ड कपमध्ये सर्व क्रिकेट जगत भारत-पाक हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसने भारत पाकिस्तान दोन्ही टीम बाबत बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानच्याच माजी खेळाडूने काढली बाबरसेनेची इज्जत, म्हणाला...
Pakistan Captain Babar AzamImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 8:48 PM

मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप 2023 येत्या 5 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. यंदाचं यजमानपद भारताकडे असल्यामुळे भारतीय संघाकडे असल्यामुळे टीम इंडियाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. या स्पर्धेसाठी आता सर्व संघ भारतामध्ये दाखल झाले असून आजपासून म्हणजेच 29 सप्टेंबर पासून सराव सामन्यांना सुरुवात झालेली आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्व क्रिकेट जगत भारत-पाक हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसने भारत पाकिस्तान दोन्ही टीम बाबत बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला वकार युनूस?

भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांची तुलना करताना पाकिस्तान संघाला वकार युनूसने कमजोर म्हटलं आहे. इतकंच नाही तर 14 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना होणार असून या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंवर जास्तीत जास्त दबाव असणार कारण या सामन्यामध्ये भारतीय चाहते मोठ्या प्रमाणात गोंगाट करतील त्यामुळे याचा नक्कीच पाकिस्तानच्या संघाच्या खेळाडूंवर परिणाम होईल, असंही युनूस म्हणाला.

भारतीय संघाकडे पाहिलं तर जडेजा आणि कुलदीप यादव सारखे उत्कृष्ट स्पिनर आहेत. त्यासोबतच भारताच्या बेंच स्ट्रेंथ पाहता कोणताही खेळाडू दुखापती झाला तरी त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून दुसरा तोडीस तोड खेळाडू भारताच्या ताफ्यात उपलब्ध आहे. त्यामुळे नक्कीच पाकिस्तान आणि भारतीय संघांमध्ये तुलना केली तर भारतीय संघाचं पारडं जड वाटत असल्याचं वकार युनूसने सांगितला आहे.

पाकिस्तानला या खेळाडूची गरज भासणार- युनूस

आशिया कप मध्ये पाकिस्तानचा घातक गोलंदाज नसीम शहा दुखापतीमुळे बाहेर झाला होता. अशिया कपनंतर तो वर्ल्डकप मधूनही बाहेर पडला, नसीमची दुखपात पाकिस्तान संघाला जिव्हारी लागणारी आहे. कारण पाकिस्तान संघाचा स्ट्राइक गोलंदाज म्हणून नसीमकडे पाहिले जातं. त्यामुळे पाकिस्तानची तोफ असलेल्या नसीम शहा उणीव त्यांना वर्ल्डकपमध्ये भासणार असल्याचं वकार युनूसने म्हटलं आहे.

दरम्यान, वर्ल्ड कप मध्ये भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना 14 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यावेळी पावसाने हजेरी लावली नाही पाहिजे नाहीतर जगभरातील चाहत्यांचा हिरमोड होईल.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.