Video : वर्ल्डकप आपला आहे ना..! फॅन्सने असा प्रश्न विचारताच रोहित शर्माने दिलं उत्तर

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. भारताने सात पैकी सात सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे टीम इंडियाकडून क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. असाच एक प्रश्न चाहत्याने विचारला आणि रोहितने त्याला उत्तर दिलं.

Video : वर्ल्डकप आपला आहे ना..! फॅन्सने असा प्रश्न विचारताच रोहित शर्माने दिलं उत्तर
Video : वर्ल्डकप जेतेपदाबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, फॅन्सच्या प्रश्नला दिलं तसंच उत्तर
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 6:30 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. सात पैकी सातही सामने एकहाती जिंकले आहेत. विरोधकांना जिंकण्याची कोणतीच संधी दिली नाही. एकही सामना अटीतटीचा झाला नाही यावरूनच भारताच्या कामगिरीचा अंदाज येतो. टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता साखळी फेरीतील औपचारिक दोन सामने खेळायचे आहेत. उपांत्य फेरी गाठल्याने टीम इंडिया जेतेपदापासून दोन पावलं दूर आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ आणि 12 वर्षानंतर वर्ल्डकपचं स्वप्न पुन्हा साकार करणार आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या याला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण इतर खेळाडूंनी त्याची उणीव भासू दिली नाही. त्यामुळे जेतेपद भारतालाच मिळणार असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा जिथे दिसेल तिथे चाहते जेतेपदाबाबत प्रश्न विचारत आहेत. असाच प्रश्न एका चाहत्याने रोहित शर्मा याला एअरपोर्टवर विचारला.

साखळी फेरीतील आठव्या सामन्यासाठी टीम इंडिया कोलकात्याला रवाना झाली आहे. 5 नोव्हेंबर टीम इंडियाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात होणार आहे.त्यानंतर टीम इंडिया 12 नोव्हेंबर नेदरलँडशी सामना करेल.तत्पूर्वी रोहित शर्माला एका चाहत्याने जोरात वर्ल्डकप आपला आहे ना? असा प्रश्न विचारला. तेव्हा त्याने जाता जाता उत्तर दिलं की, “अजून वेळ आहे.”

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारताने श्रीलंकेला 302 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजीला भलतीच धार चढल्याचं दिसून येत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शमीने 5 गडी बाद करत विक्रमही नोंदवला. भारताने 9 पैकी 9 सामने जिंकत टॉपवर राहिला तर चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी लढत होत आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर कोणता संघ येतो, याची उत्सुकता आहे. पाकिस्तानला नशिबाची साथ मिळाली तर उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळू शकतो.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.