World Cup : ‘यंदाचा वर्ल्ड कप भारत जिंकणार नाही तर…’, सुनील गावसकर यांच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ!
यंदाच्या वर्षी वर्ल्ड कप कोण जिंकणार याबाबत वक्तव्य केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सुनील गावसकर यांनी भारतीय संघाचं नाहीतर दुसऱ्याच संघाचे नाव घेतल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 च्या थराराला सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस बाकी आहेत. सर्व क्रिकेट जगत वर्ल्ड कप सुरू होण्याची वाट पाहत आहे. वर्ल्ड कपआधी अनेक आजी-माजी खेळाडू यावर्षी वर्ल्ड कपची ट्रॉफी कोण जिंकणार याबाबत भविष्यवाणी करत आहेत. मात्र अशातच लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी यंदाच्या वर्षी वर्ल्ड कप कोण जिंकणार याबाबत वक्तव्य केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सुनील गावसकर यांनी भारतीय संघाचं नाहीतर दुसऱ्याच संघाचे नाव घेतल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.
सुनील गावसकर काय म्हणाले?
यंदाच्या वर्षी वर्ल्ड कप कोण जिंकणार असा सवाल सुनील गावसकर यांना स्टार स्पोट्स चॅनेलवर विचारण्यात आला. यावर बोलताना, सध्या इंग्लंड संघ चॅम्पियन असून त्यांचा संघ एकदन मजबूत आहे. टॉप ऑर्डरमध्ये दोन- तीन मोठे ऑल राऊडंर खेळाडू आहेत जे संघाच्या गरजेनुसार बॉलिंग आणि बॅटींग करत सामन्याचं चित्र पालटवू शकतात. त्यासोबतच त्यांच्याकडे अनुभवी गोलंदाज असल्याचं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे.
2019 मध्ये इंग्लंड संघाने पहिल्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं, त्यावेळी बेन स्टोक्सने मॅचविनर खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2022 मध्ये टी-20 इंग्लंड संघानेच टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती. यंदा वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असल्याने भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. सुनील गावसकर यांनी इंग्लंड संघाला आपली पसंती दिल्याने भारतीय चाहत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंडमध्ये सराव सामना होणार होता मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार असून चेन्नईच्या चेपॉकवर 8 ऑक्टोबरला हा सामना पार पडणार आहे.
भारत: रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.