World Cup : टीम इंडियाचा विजयरथ पाहून पाकिस्तानला पोटदुखी, खेळाडू मैदानात पोहोचू नये यासाठी सूचवलं असं काही

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील 8 पैकी 8 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे पाकिस्तानला पोटदुखी झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विजयरथ रोखण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सूचवल्या जात आहेत.

World Cup : टीम इंडियाचा विजयरथ पाहून पाकिस्तानला पोटदुखी, खेळाडू मैदानात पोहोचू नये यासाठी सूचवलं असं काही
World Cup : टीम इंडियाची कामगिरी पाहून पाकिस्तानचा रडीचा डाव, खेळाडू आणि चाहत्यांना दिला अजब सल्ला
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 7:32 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने 8 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तसेच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेनेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण उर्वरित दोन संघांसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारताची स्पर्धेतील कामगिरी पाहून पाकिस्तानला पोटशूल झाला आहे. भारताचा विजयरथ कसा रोखावा यासाठी पाकिस्तानमध्ये जोरदार डिबेट सुरु आहे. यात भारताला रोखण्यासाठी काही अजब सल्ले देण्यात आले. हे सल्ले ऐकून कोणालाही हसू येईल. पाकिस्तानच्य ए स्पोर्ट्स चॅनेलवर क्रिकेटबाबतीत चर्चा असते. या चर्चेदरम्यान भारताला रोखण्यासाठी अजब सल्ला दिला. भारताला कसं रोखता येईल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वसीम अक्रमने सांगितलं की, ‘हा प्रश्न प्रत्येक संघाच्या डोक्यात असेल. मग ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका असो की न्यूझीलंड. कारण हा संघ खरंच चांगला खेळत आहे.’

वसीम अक्रमचं उत्तर संपल्या संपल्या अँकरने सांगितलं की, “वसीम अक्रम यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की भारताला पराभूत करण्यासाठी एकच उपाय आहे. तो म्हणजे खेळाडूंची बुटं आणि बॅट चोरा.” पण अँकर इतक्यावरच थांबला नाही. त्याने या उपायाची री ओढत आणखी एक सल्ला दिला. ‘मला वाटतं टीमच्या बसला टायर पंचर करावा. जेणेकरून टीम इंडिया मैदानात पोहोचणारच नाही.’ हा सल्ला ऐकून उपस्थित सर्वच हसायला लागले. हे सर्व संभाषण मस्करीत केलं जातं होतं.

मिस्बाह उल हकने उपांत्य फेरीबाबत केलं असं भाकीत

टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. याबाबत मिस्बाह उल हकने सांगितलं की, ‘उपांत्य फेरीचं गणित वेगळी असतात. जितकं टीम चांगली खेळते तितक्या अपेक्षा वाढतात. त्यामुळे भारताला दबाव झेलणं खूपच कठीण होईल.’ दुसरीकडे, शोएब मलिकने त्याला अडवत सांगितलं की, “भारत एक असा संघ आहे की दबावात सर्वात्तम कामगिरी करतो.”

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....