WTC Ranking | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पुन्हा टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आमनेसामने?

World Test Championship 20203-2025 | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2021-2023 मध्ये आमनेसामने भिडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही संघ फायनलमध्ये येण्याची शक्यता आहे.

WTC Ranking | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पुन्हा टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आमनेसामने?
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 3:51 PM

मुंबई | ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 3 विकेट्सने मात केली. न्यूझीलंडने या विजयासह ही मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 2-0 ने क्लीन स्वीप दिला. न्यूझीलंडला आपल्या घरात ऑस्ट्रेलियाकडून टी 20 पाठोपाठ टेस्ट सीरिज गमवावी लागली. न्यूझीलंडला यामुळे मोठा फटका बसला आहे. तर ऑस्ट्रेलिया टीमचा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी पॉइंट्स टेबलमध्ये 1 स्थानाची झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी पोहचलीय. तर न्यूझीलंडची दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही वेळा टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र टीम इंडिया दोन्ही वेळा अपयशी ठरली. टीम इंडियाला 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा अंतिम फेरीत धुव्वा उडवला होता.

टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड तिन्ही संघ अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.त्यामुळे या तिघांपैकी कोणतेही दोन्ही संघ फायनलमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 चा महामुकाबला हा इंग्लंडमधील लॉर्ड्स या ऐतिहासिक स्टेडियममध्ये पार पडणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्सटेबलनुसार, एका संघाला विजयासाठी 12 पॉइंट्स, सामना टाय झाल्यास 6 आणि ड्रॉ झाल्यास 4 पॉइंट्स मिळतात. तसेच स्लो ओव्हर रेटमुळे 2 पॉइंट्स दंड स्वरुपात कापले जातात. याच कारणामुळे इंग्लंडच्या खात्यात 3 विजयानंतरही 21 पॉइंट्स आहेत.

टीम इंडिया टेबल टॉपर

टीम इंडियाने धर्मशालेत पाचवा आणि अंतिम कसोटी सामना जिंकला. टीम इंडियाचा हा सलग चौथा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह ही मालिका 4-1 ने जिंकली. त्यामुळे टीम इंडिया आता पुढील काही महिने पहिल्या स्थानी कायम राहिल. टीम इंडियाला या डब्ल्यूटीसी साखळीत 3 मालिका खेळायच्या आहेत. टीम इंडिया बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध भारतात कसोटी मालिका खेळेल. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. टीम इंडियाची डब्ल्यूटीसी 2023-2025 साखळीतील शेवटची मालिका असणार आहे.

ऑस्ट्रेलियाची अखेरची मालिका मायदेशात

ऑस्ट्रेलियाला या साखळीतील अखेरची मालिका मायदेशात टीम इंडिया विरुद्ध खेळायची आहे. टीम इंडिया 2024 वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. उभयसंघात 5 सामने खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी दोन्ही संघ निश्चित होतील.

न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर

तर ताज्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंडची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र न्यूझीलंडचे बरेच सामन् बाकी आहेत. न्यूझीलंड सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. ही भारताची या साखळीतील मायदेशातील अखेरची कसोटी मालिका असणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.