World Test Championship 2025 : बांगलादेशचा भारत ऑस्ट्रेलियाला दे धक्का! अंतिम फेरीच्या शर्यतीत कसं ते समजून घ्या

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयाचा दिग्गज संघांना फटका बसला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या सारख्या दिग्गज संघांना बॅकफूटवर टाकलं आहे. बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या साखळी फेरीत मोठी उसळी घेतली आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या

World Test Championship 2025 : बांगलादेशचा भारत ऑस्ट्रेलियाला दे धक्का! अंतिम फेरीच्या शर्यतीत कसं ते समजून घ्या
कसोटीत बांगलादेशचा दिग्गज संघांना धोबीपछाड! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीसाठी टाकलं एक पाऊल
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 11:22 AM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा संपली असून आता सर्वांना वेध लागले आहेत ते टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे..असं असताना दुसरीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साखळी फेरीचे सामनेही सुरु आहेत.बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडला 150 धावांनी पराभूत केलं. या विजयासह बांगलादेशने दिग्गज संघांना धोबीपछाड दिला आहे. गुणतालिकेत मोठी उसळी घेत दुसरं स्थान गाठलं आहे. त्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंड यासारख्या संघांना फटका बसला आहे. आता न्यूझीलंड आणि बांगलादेश दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे दुसरा कसोटी सामना होईपर्यंत फटका कायम असेल. हा फटका तात्पुरता स्वरुपाचा असला तरी एक विजय गुणतालिकेवर किती फरक पाडतो ते समजून घेऊयात.

गुणतालिकेत पाकिस्तानची विजयी टक्केवारी 100 असून अव्वल स्थानी आहे. तर बांगलादेशचा संघ आता विजयी टक्केवारी 100 सह दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्यामुळे भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर प्रत्येकी दोन कसोटी सामने जिंकूनही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया खाली फेकले गेले आहेत. तर वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध एक सामना ड्रॉ केल्याचा फायदा झाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गुणांकन कसं ठरतं?

पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकल्याने विजयी टक्केवारी 100 आहे. बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 100 असून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारत तिसऱ्या स्थानावर असून वेस्ट इंडिज विरुद्ध एक सामन्यात विजय आणि एक ड्रॉ झाला म्हणून 66.67 विजयी गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

wtc2025

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या पाच सामन्यांची कसोटी मालिका झाली. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. तर एक सामना ड्रॉ झाल्याने त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. ऑस्ट्रेलिया 30 विजयी गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर वेस्ट इंडिज असून भारताविरुद्ध एक सामना ड्रॉ केल्याचा फायदा झाला. 16.67 विजयी गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंडचा संघ दोन कसोटी सामने जिंकूनही 15 विजयी गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

श्रीलंका, न्यूझीलंड एकही सामना न जिंकल्याने 0 विजयी गुणांसह संयुक्तिकरित्या 7व्या स्थानावर आहेत. तर दक्षिण अफ्रिका या सायकलमध्ये एकही कसोटी सामना खेळली नाही. त्यामुळे त्यांचेही 0 विजयी गुण आहे. याच डिसेंबर महिन्यात भारत दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्या मालिकेतील निकालानंतर गुणतालिकेवर फरक दिसून येईल. पण सध्या तरी बांगलादेशने दिग्गज संघांना धोबीपछाड दिला आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.