WTC 2025 : न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशची काढली हवा, पण भारताला झाला मोठा फायदा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठी कसोटी सामन्यांच्या मालिका सुरु आहेत. प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेवर मोठा फरक दिसून येत आहे. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश या मालिकेचाही गुणातालिकेवर प्रभाव पडला आहे. आठ दिवसांपूर्वी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बांगलादेशला मोठा फटका बसला आहे. तर टीम इंडियाला फायदा झाला आहे.

WTC 2025 : न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशची काढली हवा, पण भारताला झाला मोठा फायदा
WTC 2025 : आठ दिवसातच बांगलादेशची हवा गुल, न्यूझीलंडच्या एका विजयाने टीम इंडियाची मोठी झेप
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 3:34 PM

मुंबई : बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. मात्र या निकालाचा गुणतालिकेवर मोठा फरक पडला आहे. आठ दिवसांपूर्वी गुणतालिकेत मोठी झेप घेत दुसरं स्थान गाठणाऱ्या बांगलादेशला फटका बसला आहे. तर भारताला न्यूझीलंडच्या विजयामुळे फायदा मिळाला आहे. तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांचं नुकसान झालं आहे. कसोटीतील प्रत्येक सामना आणि मालिका विजयी टक्केवारी परिणाम करत असते. पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आता पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका मालिकेनंतर या गुणतालिकेवर मोठा फरक पडेल यात शंका नाही. चला जाणून घेऊयात कोण कोणत्या स्थानावर आहे ते

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध दोन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला असून विजयी टक्केवारी 100 आहे. त्यामुळे पहिल्या स्थानावर आहे. तर भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. एक सामना ड्रॉ झाल्याने भारताची विजयी टक्केवारी 66.67 टक्के झाली आहे. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश ही मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. पहिल्या कसोटी बांगलादेशने, तर दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघांची विजयी टक्केवारी 50 आहे. त्यामुळे दोन्ही संघ संयुक्तिकरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत.

WTC_2025

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. त्यामुळे विजयी टक्केवारीत बराच फरक पडला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 30 असून पाचव्या, तर इंग्लंडची विजयी टक्केवारी 15 असून सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजने भारताविरुद्धचा एक सामना ड्रॉ केल्याने 16.67 इतकी विजयी टक्केवारी आहे. त्यामुळे सहाव्या स्थानावर आहे. तर श्रीलंका, दक्षिण अफ्रिका यांच्या खात्यात एकही विजय नसल्याने संयुक्तिरित्या आठव्या स्थानावर आहेत.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. या दोन्ही मालिकेत विजयी टक्केवारी ज्या संघाची चांगली असेल तो संघ अव्वल स्थान गाठणार आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.