IND vs PAK | पाकिस्तान क्रिकेट टीमचा सुपर फॅन बशीर चाचा याला हैदराबाद एअरपोर्टवर ताब्यात घेतलं, कारण..
Bashir Chacha Arrested : सर्व संघ भारतामध्ये दाखल झाले असून त्या देशाच्या संघाचे पाठीराखेही भारतामध्ये दाखल होत असल्याचं दिसत आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली असून पाकिस्तानचे प्रसिद्ध चाहते बाशिर चाचा यांनी विमानतळावर पोलिसांना अटक केली आहे.

मुंबई : गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता देशभरात वर्ल्ड कप 2023चे वारे वाहू लागले आहेत. सर्व संघांची घोषणा झाली असून चाहतेही वर्ल्ड कपला कधी एकदा सुरूवात होते याची वाट पाहत आहेत. सर्व संघ भारतामध्ये दाखल झाले असून त्या देशाच्या संघाचे पाठीराखेही भारतामध्ये दाखल होत असल्याचं दिसत आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली असून पाकिस्तानचे प्रसिद्ध चाहते बाशिर चाचा यांना विमानतळावर पोलिसांना अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेच चाहते बाशिर चाचा यांना हैदरबादच्या विमानतळावर पोलिसांनी अटक केली आहे. बाशिर चाचा यांनी विमानतळावर आल्यावर उत्साहामध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवायला सुरूवात केली. 27 सप्टेंबरला रात्री बाशिर चाचा विमानतळावर आले होते त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचा झेंडा फडकावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाकिस्तानचा झेंडा फडकवत असल्याचं पाहताच त्यांना लगोलग ताब्यात घेतलं.
चौकशीमध्य काय म्हणाले बाशिर चाचा?
मी पाकिस्तान मॅचसाठी भारतात आलो असल्याचं सांगत बाशिर चाचांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य केलं. यावेळी त्यांनी पोलिसांना आपल्या प्रवासाची कागदपत्रे आणि ओळखपत्र दाखवून दिलीत. काहीवेळ चौकशी केल्यानंतर त्यांना पोलिसांनी सोडून दिलं. बाशिर चाचा यांना अटक झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने देशभर पसरली आहे.
भारत-पाक आमनेसामने
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. याआधी त्यांचा पहिला सामना नेदरलँड संघासोबत होणार आहे. तर सराव सामन्यांमध्या पाकिस्तानसोबत न्यूझीलंड संघासोबत होणार आहे.
रोहित शर्मा (C), हार्दिक पांड्या (VC), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन इशान किशन, सूर्यकुमार यादव.