WPL 2023, DC vs MI | दिल्ली कॅपिट्ल्सचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

दिल्ली कॅपिट्ल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

WPL 2023, DC vs MI | दिल्ली कॅपिट्ल्सचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 7:54 PM

नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील सातवा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलंय. या स्पर्धेत दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या 2 सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे हा सामना जिंकून दोन्ही संघांचा विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ विजय मिळवून हॅट्रिक पूर्ण करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

WPL मध्ये भारत ऑस्ट्रेलिया आमनेसामने

दिल्ली विरुद्ध मुंबई या सामन्यानिमित्ताने टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मुंबईची कॅप्टन हरमनप्रीत कौर ही टीम इंडियाची आणि दिल्लीची कॅप्टन मॅग लॅनिंग ही ऑस्ट्रेलियाची कॅप्टन आहे.

या दोघीही याआधी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भिडले होते. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा दोघी एकमेकांसमोर कॅप्टन म्हणून उभ्या टाकल्या आहेत, फरक आहे तो फक्त टीमचा.

हे सुद्धा वाचा

पॉइंट्सटेबलमध्ये दोन्ही संघांमध्ये चढाओढ

दरम्यान मुंबई आणि दिल्ली या दोन्ही टीम्स पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. दोघांनी 2 मॅचेस जिंकल्या आहेत. मात्र मुंबईचा नेट रनरेट हा चांगला असल्याने पलटण पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे.

मुंबईचा रनरेट हा +5.185 तर दिल्लीचा रनरेट हा +2.550 इतका आहे. त्यामुळे आता तिसरा सामना जिंकून कोणती टीम विजयाची हॅट्रिक साजरी करते, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, शिखा पांडे, राधा यादव आणि तारा नॉरिस.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.