WPL 2023 : DC vs MI मुंबई इंडिअन्स संघाचा सलग तिसरा विजय, दिल्लीचा विजयरथ रोखला
दोन्ही संघांनी दोन सामने जिंकले होते मात्र विजयाची हॅट्रीक मुंबई इंडिअन्सला साधता आली असून दिल्लीचा विजयरथ रोखला आहे.
मुंबई : वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील सातव्या सामना मुंबई इंडिअन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात सुरू हेता. प्रथम बॅटींग करणाऱ्या दिल्ली कॅपिट्ल्सचा डाव मुंबईने अवघ्या 105 धावांवर गुंडाळला होता. दिल्लीच्या या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाने 15 ओव्हरमध्ये टार्गेट पूर्ण करत 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईकडून यास्तिका भाटियाने सर्वाधिक 41 धावा करत संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. दोन्ही संघांनी दोन सामने जिंकले होते मात्र आता सलग तिसरा विजय साकारत मुंबई इंडिअन्सने दिल्लीचा विजयरथ रोखला आहे.
दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाने झकास सुरूवात केली होती. सलामीवीर यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी धमाकेदार खेळी करत संघावर कोणतंही दडपण येऊ दिलं नाही. दोघींनी 65 धावांची सलामी दिली. यास्तिका भाटिया हिने 32 बॉलमध्ये 41 धावांची खेळी केली. यामध्ये तिने खणखणीत 8 चौकार मारले. तर हेली मॅथ्यूजने 31 बॉलमध्ये 32 धावा केल्या.
हेली आणि यास्तिका बाद झाल्यावर मैदानात उतलेल्या नॅट सायव्हर-ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी अनुक्रमे नाबाद 23 धावा आणि 11 धावा करत संघाच्या विजायावर शिक्कमोर्तब केलं आहे. या विजयासह मुंबई संघाने गुणतालिकेतील आपलं पहिलं स्थान 6 गुणांसह आणखी मजबूत केलं आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, शिखा पांडे, राधा यादव आणि तारा नॉरिस.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.