WPL 2023, DC vs MI | दिल्लीला गुंडाळलं, मुंबईला विजयासाठी 106 धावांचं आव्हान

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिट्ल्सच्या फलंदाजांना मैदानात टिकून दिलं नाही. दिल्लीकडून कॅप्टन मेग लॅनिंग हीने सर्वाधिक धावा केल्या.

WPL 2023, DC vs MI | दिल्लीला गुंडाळलं, मुंबईला विजयासाठी 106 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 9:33 PM

नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील सातव्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयासाठी 106 धावांचं आव्हान मिळालं आहे. दिल्ली कॅपिट्ल्सला मुंबईच्या गोलंदाजांनी 105 धावांवरच रोखलं. दिल्लीला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दिल्लीचा डाव 18 ओव्हरमध्येच आटोपला. मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर कॅप्टन मेग लॅनिंग हीचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला फार वेळ मैदानात थांबता आलं नाही. मेगने पहिल्या 2 सामन्यात बॅक टु बॅक फिफ्टी मारली होती. तर या सामन्यात मेगने दिल्लीकडून सर्वाधिक 43 धावा केल्या. तिच्या या खेळीमुळे दिल्लीला मुंबईसमोर 100 पेक्षा अधिक धावांचं आव्हान देता आलं. तर मुंबईकडून साईका इशाक, हॅली मॅथ्यूज आणि इस्सी वोंग या तिकडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

पलटणला विजयासाठी 106 धावांची गरज

हे सुद्धा वाचा

मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीला सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने धक्के देणं सुरुच ठेवलं. त्यामुळे दिल्लाच्या एकाही जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही . मेगचा अपवाद वगळता दिल्लीकडून जेमिमाह रॉड्रिग्स हीने 25 आणि राधा यादव हीने 10 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.

चांगल्या फॉर्मात असलेली शफाली वर्मा हीने निराशा केली. शफालीला साईका इशाकने 2 धावांवर बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अॅलिस कॅप्सी 6 रन्स करुन माघारी परतली. मारिझान कॅप हीने 2 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. जेस जोनासेन हीने 2 धावा केल्या. तानिया भाटीया 4 धावांवर आऊट झाली. मिन्नू मणी आणि तारा नॉरी या दोघींना भोपळाही फोडता आला नाही. तर शिखा पांडे 4 धावांवर नाबाद राहिली.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, शिखा पांडे, राधा यादव आणि तारा नॉरिस.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.