WPL 2023, Meg Lanning | कॅप्टन मेग लॅनिंग हीची बॅक टु बॅक फिफ्टी, यूपी संघाला इतक्या धावांचं आव्हान

वुमन्स प्रीमिअर लीगमधील पाचवा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यात सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 211 धावांचं आव्हान यूपी वॉरिअर्स संघाला दिलं आहे.

WPL 2023, Meg Lanning | कॅप्टन मेग लॅनिंग हीची बॅक टु बॅक फिफ्टी, यूपी संघाला इतक्या धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 9:43 PM

मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीगमधील पाचवा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यात सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 211 धावांचं आव्हान यूपी वॉरिअर्स संघाला दिलं आहे. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर संघाने मजबूत सुरूवात केली होती. जेमिमाह रॉड्रिक्स नाबाद 34 आणि जेस जोनासेननेही नाबाद 42 धावा करत निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 211 धावा केल्या आहेत. यूपी वॉरिअर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी संघाच्या प्रमुख फलंदाजांना आता मोठी खेळी करावी लागणार आहे.

प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली संघाची सलामीवीर कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी जबरदस्त सुरूवात केली. मेग लॅनिंगने बॅक टु बॅक फिफ्टी केली. 42 चेंडूत तिने 70 धावा केल्या असून यामध्ये 10 चौकार आणि 3 षटकार मारले. शफालीला मोठी खेळी करता आली नाही, अवघ्या 17 धावांवर ती परतली. त्यानंतर मरिझेन काप्प आणि एलिस कॅपसे यांनी अनुक्रमे 16 आणि 21 धाव केल्या आणि बाद झाल्या. जेमिमा आणि जेस जोनासेन यांनी मोर्चा हाती घेतला आणि संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. जेमिमा रॉड्रिग्सने  34 धावा आणि जेस जोनासेनने 42 धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, मरिझेन काप्प, जेमिमा रॉड्रिग्स, एलिस कॅपसे, जेस जोनासेन, तानिया भाटिया, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नोर्रिस

युपी वॉरियर्स : अलीसा हिली (कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहिला मॅकग्राथ, दीप्ती शर्मा, सिमरन शेख, देविका वैद्य, सोफी एक्सलस्टोन, शबनिम इस्माईल, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.