WPL Final 2023 | मुंबई इंडियन्स वूम्सन चॅम्पियन, दिल्लीवर 7 विकेट्सने शानदार विजय

मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमिअर लीग फायनलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स या विजयासह ट्रॉफी जिंकली आहे.

WPL Final 2023 | मुंबई इंडियन्स वूम्सन चॅम्पियन, दिल्लीवर 7 विकेट्सने शानदार विजय
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 11:17 PM

मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग 2023 अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 7 विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्स या विजयासह वूमन्स चॅम्पियन ठरली आहे. मुंबईने शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात दिल्लीवर मात केली. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 132 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईकडून नॅट नॅट सायव्हर-ब्रंट हीने सर्वाधिक नाबाद 60 धावांची निर्णायक अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 37 धावा केल्या. मेली केर हीने नाबाद 14, हॅली मॅथ्यूज हीने 13 आणि यास्तिका भाटीयाने 4 धावांचं योगदान दिलं. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासेन या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सचा शानदार विजय

दिल्लीची बॅटिंग

दरम्यान त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. दिल्लीने मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली होती. दिल्लीचे फलंदाज हे फक्त काही धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरत होते. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर नांग्या टाकल्या होत्या. त्यामुळे दिल्लीची 79-9 अशी स्थिती झाली होती. यामुळे दिल्ली अडचणीत सापडली. मात्र शिखा पांडे आणि राधा यादव या दोघींनी दिल्लीची लाज राखली. या दोघींनी केलेल्या खेळीमुळे दिल्लीला सन्मानजनक आव्हान देता आलं.

10 व्या विकेट्साठी अर्धशतकी भागीदारी

राधा यादव आणि शिखा पांडे या जोडीने 10 विकेट्ससाठी 52 धावांची निर्णायक आणि नाबाद भागीदारी केली. यादरम्यान शिखा पांडे आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी 27 धावांची नाबाद खेळी केली. या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 131 धावा केल्या. दिल्लीला या भागीदारीमुळे मुंबईला 132 धावांचं सन्मानजनक आव्हान देता आलं.

राधा आणि शिखा या दोघींव्यतिरिक्त दिल्लीकून कर्णधार मेग लॅनिंग हीने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर मुंबईकडून इस्सा वाँग आणि हॅली मॅथ्यूज या दोघींनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मेली केर हीने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन| हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, राधा यादव आणि शिखा पांडे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.