Delhi Capitals Vs Mumbai Indians W Live Streaming | फायनलाबाबत जाणून घ्या सर्वकाही
वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स वूमन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स वूमन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येतंय. जाणून घ्या सामन्याबाबत सर्वकाही
मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेला 4 मार्च रोजी सुरुवात झाली. आता स्पर्धा अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहचली आहे. वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील अंतिम सामना हा रविवारी 26 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. दिल्लीने शानदार कामगिरी करत फायनलमध्ये थेट धडक मारली. तर दुसऱ्या बाजूला शुक्रवारी एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सला 72 धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात फायनल खेळवण्यात येणार आहे.
साखळी फेरीत 2 वेळा आमनेसामने
मुंबई आणि दिल्ली हे दोन्ही संघ या स्पर्धेतील साखळी फेरीत एकूण 2 वेळा आमनेसामने आले. पहिल्यांदा उभयसंघात 9 मार्च रोजी सामना झाला. मुंबईने दिल्लीवर या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला होता. तर यानंतर 18 मार्च ला पुन्हा दोन्ही संघ भिडले. या सामन्यात दिल्लीने मागील पराभवाचा वचपा घेतला. दिल्लीने मुंबईला 9 विकेट्सने मात दिली होती. दरम्यान या अंतिम सामन्याच्या निमित्ताने मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यातील महामुकाबल्याबाबत आपण सर्व माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कुठे आणि केव्हा पाहता येणार फायनल?
मुंबई इंडियन्स वूमन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील हा महामुकाबला 26 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
या अंतिम सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होणार आहे. तर अर्धा तास आधी 7 वाजता टॉस उडवला जाणार आहे.
अंतिम सामन्याचं आयोजन कुठे?
मुंबई इंडियन्स वूमन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?
क्रिकेट चाहत्यांना हा महामुकाबला स्पोर्ट्स् 18 नेटवर्कवर पाहता येईल.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
ज्यांना टीव्हीवर सामना पाहणं शक्य नाही, ते आपल्या मोबाईलवर लाईव्ह सामना हा जिओ सिनेमा एपवर पाहू शकतात.
मुंबई इंडियन्स टीम |हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया,अमनजोत कौर, हेली मैथ्यूज , क्लोए ट्रायन , नैट सिवर,धारा गुज्जर, साइका इशाक, हुमैरा काजी, प्रियंका बाला,सोनम यादव, नीलम बिष्ट, सी वँग , हेदर ग्राहम , जिनटीमानी कालिटा, पूजा वस्त्राकर आणि अमेलिया कर.
दिल्ली कॅपिटल्स | मेग लँनिंग (कॅप्टन), जेमिमा रोड्रिग्स, शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, राधा यादव, शिखा पांडे, मारिजान कैप, टाइटस साधु, लौरा हॅरिस, तारा नॉरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणि, तान्या भाटिया (विकेटकीपर) , पूनम यादव, जेस जोनासेन, स्नेहा दीप्ति, अरुंधती रेड्डी आणि अपर्णा मंडल.