WPL : हुकमाचा एक्का राहिलेला Unsold, तिला कोणीच नाही दिला भाव पण आज तीच मुंबई इंडिअन्सला ट्रॉफी देऊन गेली!
मुंबई इंडिअन्स संंघाने WPL पहिली ट्रॉफी जिंकली, पण मुंबईतील एका खेळाडूचा खऱ्या अर्थाने फायनल दिवशी दिवस होता. त्याच खेळाडूनेही मुंबईला ट्रॉफी उंचावून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
मुंबई : वूमन्स आयपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडिअन्स संघाने धडक मारली होती. यामध्ये मुंबईच्या संघाने बाजी मारत ट्रॉफीवर नाव कोरलं. मुंबईच्या संघाचीही विजय मिळवताना दमछाक झालेली पाहायला मिळाली होती. मुंबई इंडिअन्स संंघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्या नेतृत्त्वाखाली विजयश्री मिळवून दिलं. त्यासोबतच मुंबईतील एका खेळाडूचा खऱ्या अर्थाने फायनल दिवशी दिवस होता. त्याच खेळाडूनेही मुंबईला ट्रॉफी उंचावून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
ही खेळाडू दुसरी तिसरी कोणी नसून हेली मॅथ्यूज आहे, हेलीने फायनलमध्येही चांगलं प्रदर्शन केलं. दिल्लीसाठी सर्वात घातक ठरली ती म्हणजे मुंबईची खेळाडू हेली मॅथ्यूज. हेलीने 16 व्या ओव्हरमध्ये एकही धाव न देता दोन विकेट घेतल्या. आपल्या स्पेलमध्ये हेलीने 2 विकेट्स घेत 2 ओव्हर मेडन टाकत फक्त 5 धावा दिल्या आणि 3 कॅचही घेतले. मुंबईच्या विजयात हेलीने महत्त्वाची भूमिका बजावली.
हेली मुंबईकडून सलामीला उतरत होती, तिने सुरूवातील मोठी खेळी करत मुंबईला जशी हवी ती सुरूवात करून देत होती. सुरूवातीला काही सामन्यानंतर हेलीकडे पर्पल आणि ऑरेंज अशा दोन्ही कॅप होत्या. स्पर्धेच्या शेवटी तिने पर्पल कॅप मिळवलीच तर ऑरेंज कॅपसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी होती. 10 सामन्यांमध्ये 16 विकेट्स तिने घेतल्या त्यासोबतच तिने 30.11 च्या सरासरीने 271 धावा केल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती का याची मॅथ्यूजला पहिल्या फेरीत कोणीही खरेदी केलं नव्हतं. मात्र मुंबईने पुढच्या फेरीत तिला 40 लाख रूपयांना विकत घेत आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं. तिनेही मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि निवड सार्थ ठरवली.
लीगच्या पहिल्या सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या टॉप 5 यादीत एकच भारतीय आहे. टॉप 10 मध्ये भारताच्या फक्त दोन गोलंदाज आहेत. साइक इशाकशिवाय शिखा पांडे टॉप 10 मध्ये आहे. शिखा सातव्या नंबरवर आहे. तिने 9 सामन्यात 6.59 च्या सरासरीने 211 धावा देऊन 10 विकेट काढल्या.
अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 7 विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचलाय. मुंबई इंडियन्स या विजयासह वूमन्स चॅम्पियन ठरली आहे. मुंबईने शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात दिल्लीवर मात केली.