WPL लिलावामध्ये पहिल्या राऊंडला कोणाही नाही घेतलं, आता मुंबईकरांनी तिलाच घेतलंय डोक्यावर!
लीगच्या लिलावाच्या पहिल्या फेरीत त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने विचारही केला नव्हता. तिला मुंबईकरांनी डोक्यावर घेतलं आहे.
मुंबई : WPl चा लिलाव पार पडला आणि पहिल्या पर्वाल सुरूवात झालीये. वुमन्स प्रीमिअर लीगमधील सामनेही अटीतटीचे होताना दिसत आहेत. अशातच आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक चौकार-षटकार मारलेल्या खेळाडूच्या नावाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. इतकंच नाहीतर या खेळाडूला मुंबईकरांनी डोक्यावर घेतलं आहे. आता जरी तिची वाहवाह होत असली तरी त्या खेळाडूचा लीगच्या लिलावाच्या पहिल्या फेरीत त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने विचारही केला नव्हता. आता याच खेळाडूकडे ऑरेंज कॅपही गेली आहे.
ही खेळाडू दुसरी तिसरी कोणी नसून हेली मॅथ्यूज आहे. मुंबई इंडिअन्सकडून खेळताना सलामीला येणाऱ्या हेलीने पहिल्या पर्वात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारले आहेत. याच मॅथ्यूजला पहिल्या फेरीत कोणीही खरेदी केलं नव्हतं. मात्र मुंबईने पुढच्या फेरीत तिला 40 लाख रूपयांना विकत घेत आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं.
इतकंच नाहीतर सामना सुरू होण्यापूर्वीच त्याला वेस्ट इंडिज संघातून वगळण्यात आले होते. ही गोष्ट 2019 ची असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होम सीरिजमध्ये वेस्ट इंडिजच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप मॅथ्यूजवर लावण्यात आला होता. याच खेळाडूने आता मुंबईची सलामीची कमान आपल्या खांद्यावर घेतली असून संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाट उचलत आहे.
हेली मॅथ्यूज हिने 2 सामन्यांमध्ये 124 धावा केल्या आहेत. यामध्ये तिने 5 सिक्स आणि 16 चौकार मारले आहेत. मॅथ्यूजने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 38 चेंडूत नाबाद 77 धावांची खेळी केली. लीगमध्ये सर्वाधिक चौकार आणि षटकार मारले आहेत.
दरम्यान, मुंबईचे आतापर्यंत दोन सामने झाले असून त्यांनी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पर्वातील पहिल्या सामन्यात 143 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली आणि मुंबईचे गुण सारखे झाले आहेत मात्र पहिल्या सामन्यातील मोठ्या विजयामुळे नेट रनरेटच्या आधारावर मुंबई अग्रस्थानी कायम आहे.