WPL : 2008 पुरूष IPl मध्ये पहिल्या चौकार, सिक्सरपासून ते विकेटपर्यंत वाचा सर्व काही एका क्लिकवर
2008 स्पर्धेतील पुरूष IPl मध्ये पहिला चौकार, सिक्सर, विकेट आणि पहिली ओव्हर कोणी टाकली होती हे ट्रेडिंग होत आहे. याबाबत आपण जाणून घ्या.
मुंबई : वुमन्स आयपीएलच्या हंगामातील पहिला (WPl 2023) सामना झाला असून मुंबई संघाने विजयाचा श्रीगणेशा केला आहे. वुमन्स प्रीमिअर लीगमधील पहिल्या सामन्यामध्ये गुजरात आणि मुंबईच्या खेळाडूंनी पहिलाच सामना खेळत इतिहासात नोंद केली आहे. 2008 स्पर्धेतील पुरूष IPl मध्ये पहिला चौकार, सिक्सर, विकेट आणि पहिली ओव्हर कोणी टाकली होती हे ट्रेडिंग होत आहे. याबाबत आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दिग्गजांनी हे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
2008 साली सुरू झालेल्या आयपीएलमध्ये पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला होता. त्यावेळी स्पर्धेतील पहिला चेंडू प्रवीण कुमार याने टाकला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सच्या ब्रेंडन मॅक्युलम याने पहिली धाव काढली होती. कोलकाता संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता तर बंगळुरू संघाची फिल्डिंग होती.
पहिली विकेट ही भारताचा दिग्गज बॉलर झहीर खान याने घेतली होती. झहीरने दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीला बाद केलं होतं. पहिला चौकार ब्रेंडन मॅक्युलमनेच मारला होता तर सिक्सरही त्यानेच मारला होता. पहिल्याच सामन्यामध्ये मॅक्युलमने तोडफोड फलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने नाबाद 158 धावा केल्या होत्या.
दरम्यान, आजच्या सामन्यात पहिला चौकार मारण्याचा मान हा मुंबईच्या हेली मॅथ्यूजने मिळवला. गुजरातची खेळाडू मानसी जोशीच्या षटकात मॅथ्यूज पहिला चौकार मारला. हेलीने संधीचं सोनं करत फक्त चौकारच नाहीतर पहिला सिक्सर मारण्याचा मानही मिळवला. आता राहिलं ते म्हणजे स्पर्धेतील पहिली विकेट, तर गुजरातच्या तनुजा कंवरने यास्तिका भाटियाला बाद करत हा मान मिळवला. तर पहिलं अर्धशतक हरमनप्रीत कौरने ठोकलं आहे.
मुंबई इंडियन्स महिला संघ – यास्तिका भाटिया, हेले मॅथ्यु, नॅट क्विवर ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकार, इसी वाँग, हुमैरा काझी, अमैला केर, अमनजोत कौर, जिंतीमनी कालिता, सायका इशाक
गुजरात जायंट्स महिला संघ – बेथ मूनी, सब्बीनेनी मेघना, हर्लीन देओल, अॅशले गार्डनर, अनाबेल सुथरलँड, दयालन हेमलथा, जॉर्जिया वारेहम, स्नेह राणा, तनुजा कनवार, मानसी जोशी, मोनिका पटेल