WTC Final : टीम इंडियाला आमचे ‘हे’ तीन खेळाडू पुरून उरले’; कर्णधार पॅट कमिन्सने जखमेवर चोळलं मीट!
फायनलमध्ये झालेला पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला आहे कारण सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये स्थान निर्माण केलेल्या टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या वक्तव्याने भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यामध्ये पहिल्या दिवसापासून कांगारूंनी वर्चस्व राखत टीम इंडियाला कमबॅक करण्याची एकही संधी दिली नाही, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप जिंकत आयसीसीच्या सर्व ट्रॉफीवर नाव कोरण्याचा पराक्रम करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच संघ ठरला आहे.
हा पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला आहे कारण सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये स्थान निर्माण केलेल्या टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या वक्तव्याने भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
काय म्हणाला कमिन्स?
सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, टॉस हरल्यानंतर आम्ही खूप चांगली कामगिरी केली. आम्ही नाणेफेक जिंकली असती तरीही आम्ही प्रथम बॉलिंग केली असती. स्मिथ आणि हेडने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे आम्ही चांगल्या स्थितीत पोहोचू शकलो. त्यासोबतच बोलंडनेही उत्तम कामगिरी केल्याचं सांगत आम्ही बहुतेक वेळा भारतावर वर्चस्व राखल्याचं कमिन्सने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 आणि दुसऱ्या डावात 270 धावा करून डाव घोषित केला होता. त्याच वेळी, भारत पहिल्या डावात 296 आणि दुसऱ्या डावात 234 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलिया ICC च्या सर्व ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरला आहे.
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार