WPL : वुमन्स आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूने रचला इतिहास, ठोकलं सर्वात फास्ट अर्धशतक
गुजराज जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला गेलाआहे. महिला प्रीमियर लीगमध्ये या लीगमध्ये सर्वात फास्ट अर्धशतक मारलं आहे.
मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीग स्पर्धा जशजशी पुढे जात आहे तसतसे रेकॉर्ड होत असलेले पाहायला मिळत आहे. आता सुरू असलेल्या गुजरात जायन्ट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यामध्ये एक मोठा रेकॉर्डची नोंद झाली आहे. गुजराज जायंट्सची सलामीवीर सोफिया डंकलेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात फास्ट अर्धशतक झळकावणारी ती खेळाडू ठरली आहे.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात सोफियाने अवघ्या 18 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. 28 बॉलमध्ये तिने 65 धावांची खेळी करत संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. यामध्ये तिने 11 चौकार तर 3 षटकार मारले.
तिसऱ्या गड्यासाठी हर्लीन देओल आणि एशले गार्डनरनं 53 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एशले गार्डनर 15 चेंडूत 19 धावा करून बाद झाली. दयालन हेमलथानं हर्लीनला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण 7 चेंडूत 16 धावा करून तंबूत परतली. तिने 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्यानंतर अन्नाबेल सुथरलँड 14 धावा करून बाद झाली. तरीही हर्लीननं आपली एकाकी लढत सुरुच ठेवली होती. त्यानंतर स्नेह राणा 2 धावा करून धावचीत झाली.हर्लीन शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्रिफळाचीत होऊन तंबूत परतली.
दोन्ही संघांची प्लेईंग 11
गुजरात जायन्ट्स संघ | सब्भिनेनी मेघना, सोफिया डंकले, हर्लीन देओल, एशले गार्डनर, अन्नाबेल सुथरलँड, सुष्मा वर्मा, दयालन हेमलथा, स्नेह राणा (कर्णधार), तनुजा कनवार, किम गार्थ, मानसी जोशी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | स्मृती मंधाना (कर्णधार), सोफि डेवि, एलिसे पेरी, हिथर नाईट, रिचा घोष, पूनम खेमनर,कानिका अहुजा, श्रेयंका पाटील, मेगन स्कट, रेणुका सिंह, प्रीती बोस