WPL 2023, MI VS DC | दिल्लीच्या गोलंदाजांचा धमाका, मुंबई इंडियन्सला रोखलं, विजयासाठी 110 धावांचं आव्हान

वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडत आहेत. याआधीच्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला होता.

WPL 2023, MI VS DC | दिल्लीच्या गोलंदाजांचा धमाका, मुंबई इंडियन्सला रोखलं, विजयासाठी 110 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 9:35 PM

नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील 18 वा सामन्यात मुंबई इंडियन्स वूमन्सने दिल्ली कॅपिट्ल्स वूमन्सला विजयासाठी 110 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला लगाम लावल्याने पलटणला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 109 धावा केल्या. मुंबईकडून पूजा वस्त्राकर हीने सर्वाधिक 26 धावा केल्या. मात्र दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोलंदाजांनी तिला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यापासून रोखलं. दिल्लीकडून मारिजाने काप, शिखा पांडे आणि जेस जोनासेन या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. दिल्लीने मुंबईला सुरुवातीपासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. यास्तिका भाटीया, हॅली मॅथ्यूज आणि नॅट ब्रंट या तिघी अनुक्रमे 1,5 आणि 0 धावांवर बाद झाल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि वाँग या दोघींनी प्रत्येकी 23 धावा केल्या.

पूजा वस्त्राकर हीने सर्वाधिक 26 धाावंचं योगदान दिलं. अमनजोत कौर हीने 19 रन्स जोडल्या. अमेलिया केर हीने 8 धावा केल्या. तर हुमायरा काझी 2 धावांलर नाबाद राहिली. मारिजाने काप, शिखा पांडे आणि जेस जोनासेन या तिकडी व्यतिरिक्त अरुंधती रेड्डी हीने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

हे सुद्धा वाचा

पहिल्या स्थानासाठी रस्सीखेच

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी प्रत्येकी 4 सामना जिंकून प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं आहे. आता हा सामना जिंकून दिल्लीचा मुंबई विरुद्धच्या मागील सामन्यातील पराभवाचा वचपा आणि अव्वल स्थानी झेप घेण्याचा प्रयत्न असणार आहे. तर या स्पर्धेत दुसऱ्यांदा दिल्लीला पराभूत करत साखळी फेरीती पहिलं स्थान कायम ठेवण्याचा मानस हा मुंबई इंडियन्सचा असणार आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, इस्सी वोंग, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता आणि सायका इशाक.

दिल्ली कॅपिट्ल्स | मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, तानिया भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे आणि पूनम यादव.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.