WPL 2024, MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आज होणार फैसला, नाणेफेकीचा कौल जिंकत घेतली गोलंदाजी

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 18 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. या सामन्यावर सर्वच संघांचं भवितव्य अवलंबून आहे. टॉप 3 साठी तीन संघ डोळे लावून आहेत. तर अव्वल स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल कोणाच्या पथ्यावर पडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

WPL 2024, MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आज होणार फैसला, नाणेफेकीचा कौल जिंकत घेतली गोलंदाजी
WPL 2024, MI vs RCB : राहणार की जाणार! बंगळुरुचं सर्वस्वी या सामन्यावर अवलंबून, टॉस मुंबईने जिंकला
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 7:08 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. टॉप 3 आणि अव्वल स्थानासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्सचं लक्ष अव्वल स्थान गाठण्याकडे असेल. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टॉप 3 मधील स्थान निश्चित करण्यासाठी धडपड करणार आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारतं याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने दिलेलं आव्हान बंगळुरुला गाठावं लागणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाने सांगितलं की, ‘आम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायला आवडेल. ही एक नवीन विकेट आहे. धावांचा पाठलाग करणं चांगले होईल. एका धावेने पराभव पचावण कठीण होतं. एक धाव आम्हाला ठरवू शकत नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. आम्हाला तिन्ही विभागांमध्ये चांगले असणे आवश्यक आहे, ते महत्त्वपूर्ण असेल.’

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं की, “आम्हाला फलंदाजी करायची होती. खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज घ्यायचा होता. हा एक नवीन दिवस आहे, नवीन खेळ आहे, मला पहिल्या चेंडूपासून सुरुवात करावी लागेल. संघात इतके मॅचविनर्स असणे ही सन्मानाची बाब आहे. यास्तिकाची तब्येत बरी नाही. तिच्याऐवजी बाला खेळत आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, प्रियांका बाला (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.