WPL 2024, MI vs RCB : मुंबई इंडियन्स पुन्हा पडली आरसीबीवर भारी, 7 गडी राखून विजय
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील नववा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने 7 गडी राखून जिंकला. मुंबईने तीन सामने जिंकत आता अव्वल स्थान गाठलं आहे.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या नववा सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना मुंबईने 7 गडी राखून जिंकला. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच बंगळुरुला 20 षटकात 131 धावांवर रोखलं. बंगळुरुने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 132 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 15.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. हा निर्णय मुंबईच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी योग्य ठरवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. मागच्या पर्वातही मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दोनदा पराभूत केलं होतं. आता तोच कित्ता यंदाच्या पर्वातही गिरवला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, एस सजना, अमनजोत कौर, हुमैरा काझी, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक
दोन्ही संघांचे खेळाडू
मुंबई इंडियन्स महिला संघ: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, एस साजना, अमनजोत कौर, हुमैरा काझी, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक, हरमनप्रीत कौर, शबन इस्माईल, क्लो ट्रायॉन, फातिमा जाफर, जिंतिमनी कलिता, प्रियांका बाला, अमनदीप कौर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, सभिनेनी मेघना, ऋचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, नादिन डी क्लर्क, सिमरन बहादूर, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग, इंद्राणी रॉयल शुभा सतीश, श्रद्धा पोखरकर, दिशा कासट, केट क्रॉस, एलिस पेरी, एकता बिष्ट