WPL 2024, RCB vs MI : मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत निवडली गोलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील नववा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. विजय मिळवणारा संघ गुणतालिकेत टॉप स्थानावर पोहोचेल. त्यामुळे या सामन्यात कोण विजय मिळवते याची उत्सुकता आहे.

WPL 2024, RCB vs MI : मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत निवडली गोलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 7:10 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील पहिले दोन सामने जिंकले आणि तिसऱ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. स्पर्धेतील या दोन्ही संघांचा हा चौथा सामना आहे. या सामन्यातील विजयानंतर स्पर्धेतील पुढची वाटचाल ठरणार आहे. त्यामुळे बंगळुरुच्या मैदानात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. दुसऱ्या सत्रात पडत असलेलं दव पाहता हा निर्णय घेतला गेला आहे. कारण चेंडू ओला झाला की अचूक गोलंदाजी करणं कठीण होतं आणि फलंदाजांना फायदा होतो. दुखापतीमुळे हरमनप्रीत कौर आजही सामना खेळत नाही. त्यामुळे संघाची धुरा नॅट सायव्हर ब्रंटकडे आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर म्हणाली, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. सामान्यत: आतापर्यंत या स्पर्धेत, पाठलाग करणे सोपे झाले आहे. संघात कोणताच बदल केला नाही. मागच्या सामन्यातीलच संघ असणार आहे.”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कर्णधार स्मृती मंधानाने सांगितलं की, “चांगले क्रिकेट खेळण्याबद्दल आणि सर्व ठिकाणी योग्य गोष्टी केल्या तर बरंच काही सोपं आहे. जर आपण योग्य गोष्टी केल्या तर आपण कोणालाही पराभूत करू शकतो.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, एस सजना, अमनजोत कौर, हुमैरा काझी, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक

दोन्ही संघांचे खेळाडू

मुंबई इंडियन्स महिला संघ: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, एस साजना, अमनजोत कौर, हुमैरा काझी, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक, हरमनप्रीत कौर, शबन इस्माईल, क्लो ट्रायॉन, फातिमा जाफर, जिंतिमनी कलिता, प्रियांका बाला, अमनदीप कौर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, सभिनेनी मेघना, ऋचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, नादिन डी क्लर्क, सिमरन बहादूर, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग, इंद्राणी रॉयल शुभा सतीश, श्रद्धा पोखरकर, दिशा कासट, केट क्रॉस, एलिस पेरी, एकता बिष्ट

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.