WPL 2024 Auction : ऑस्ट्रेलियाच्या अन्नाबेल सुथरलँडवर लागली सर्वाधिक बोली! मुंबई आणि दिल्लीमध्ये रंगली जोरदार चुरस
वुमन्स प्रिमियरल लीगचं दुसरं पर्व 2024 मध्ये सुरु होणार आहे. या स्पर्धेपूर्वी दुबईत खेळाडूंवर बोली लागली आहे. या लिलावात एकूण 165 खेळाडू आहेत. त्यापैकी फक्त 30 खेळाडूंना डब्ल्यूपीएल 2024 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. कारण संघांनी लिलावापूर्वी इतक्यात खेळाडूंना रिलीज केंल आहे. या बोलीत आतापर्यंत सर्वाधिक बोली ही ऑस्ट्रेलियाच्या अन्नाबेल सुथरलँडवर लागली. यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस रंगली.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेसाठी 30 खेळाडूंसाठी बोली सुरू आहे. एकूण 165 खेळाडूंचा या बोलीसाठी समावेश आहे. यापैकी फक्त 30 खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. बोली सुरु असताना कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळणार? कोणता संघ सहभागी करून घेणार याबाबत उत्सुकता आहे. लिलावात काही खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यांना कोणीही खरेदीदार मिळाला नाही. तर काही खेळाडूंना बेस प्राईसच्या उपर रक्कम मिळाली आहे. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अन्नाबेल सुथरलँड हिच्यावर जबरदस्त बोली लागली. बेस्ट प्राईस 40 लाख असताना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस निर्माण झाली. बोली लागत लागत ही किंमत दोन कोटी रुपयांपर्यंत गेली. अर्थात दोन कोटींची बोली लावत दिल्ली कॅपिटल्सने अन्नाबेल सुथरलँड हिला आपल्या चमूत सहभागी करून घेतलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात 2.25 कोटी आणि मुंबईच्या खात्यात 2.1 कोटी रुपये असताना ही चुरस पाहायला मिळाली. यावरून ऑस्ट्रेलियाची अन्नाबेल सुथरलँड किती महत्त्वाची आहे हे जाणून येतं. दिल्ली कॅपिटल्सने 2.25 कोटी रुपयातील 2 कोटी खर्च करून अन्नाबेल सुथरलँडला संघात घेतलं आहे. तर 25 लाखात इतर खेळाडूंना घ्यावं लागणार आहे. जर बेस प्राईस 25 लाखांच्या खाली असेल तर एखादा खेळाडू घेता येईल.
Most expensive buy of the #TATAWPLAuction so far!
The @DelhiCapitals get Australia's Annabel Sutherland for INR 2 Crore 🤯
What do you make of this purchase folks? #TATAWPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/ocYYchWa8I
— Women's Premier League (WPL) (@wplt20) December 9, 2023
दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेच्या शबनिम इस्माईलसाठी गुजरात आणि मुंबईत चुरस पाहायला मिळाली. बेस प्राईस 40 लाख होती आणि बोली 1.2 कोटीपर्यंत लागली. मुंबई इंडियन्सने 1.2 कोटी खर्च करून तिला आपल्या चमूत घेतलं आहे. लिलावात गुजरात टायटन्सकडे सर्वाधिक 5.95 कोटी रुपये आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे 3.35 कोटी, दिल्ली कॅपिटल्सकडे 2.25 कोटी, युपी वॉरियर्सकडे 4 कोटी, तर मुंबईकडे 2.1 कोटी रुपये आहे. त्यापैकी काही पैसे आता खर्च झाले असून उर्वरित पैशात इतर खेळाडू घ्यायचे आहेत.
Relive the action packed bid 😮
Annabel Sutherland gets sold to @DelhiCapitals for INR 2Cr 🙌
She is the most expensive buy in the #TATAWPLAuction so far 🥳@tatacompanies pic.twitter.com/57dxgQwWep
— Women's Premier League (WPL) (@wplt20) December 9, 2023
दिल्ली कॅपिटल्सचा सध्याचा संघ : एलिस कॅप्से, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिजाने काप,मेग लॅनिंग, मीन मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटीया, टिटास साधु
मुंबई इंडियन्सचा सध्याचा संघ : अमनजोत कौर, अमेलिया केर, सी ट्रायोन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, हुमैरा काजी, इसाबेल वोंग, जिन्तिमणी कलिता, नताली सायवर, पूजा वस्त्राकार, प्रियंका बाला, साइका इशाक, यास्तिका भाटिया