WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगसाठी अखेर बीसीसीआयचं मॉडेल ठरलं! अशा पद्धतीने सामन्यांचं होणार नियोजन

वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी जोरदार तयारी सुरु झाली. पहिल्या पर्वाला क्रीडारसिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता दुसऱ्या पर्वासाठी बीसीसीआयने खास नियोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी कारवाँ मॉडेल जवळपास निश्चित करण्यात आलं आहे. चला जाणून घेऊयात काय ते

WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगसाठी अखेर बीसीसीआयचं मॉडेल ठरलं! अशा पद्धतीने सामन्यांचं होणार नियोजन
WPL 2024 : वुमन्स स्पर्धेसाठी यंदा बीसीसीआयचं कारवाँ मॉडेल! दुसऱ्या पर्वासाठी असं असेल व्यवस्थापन
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 3:51 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठीचा लिलाव नुकताच पार पडला. पाच संघांनी या लिलावातून दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात घेतलं आहे. बीसीसीआयने देखील दुसऱ्या पर्वासाठी जोरदार तयारी केली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार स्पर्धेचं आयोजन 22 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. दुसऱ्या पर्वात एकाच ठिकाणी सामने ठेवण्यासाठी वेगवेगळी ठिकाणं निवडण्याचा बीसीसीआयचा मानस होता. आता यासाठी बीसीसीआयने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच कारवाँ मॉडेलसाठी दोन ठिकाणं निश्चित केली आहेत. वुमन्स प्रीमियर लीगचं पहिलं पर्व मुंबईतच पार पडलं होतं आहे. आता दुसऱ्या पर्वात बंगळुरु आणि दिल्ली ही दोन ठिकाणं जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे बीसीसीआयचं या शिक्कामोर्तब झालं की ही स्पर्धा दोन ठिकाणी खेळली जाईल.

दुसऱ्या पर्वातील पहिल्या टप्प्यातील सामने बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात, नवी दिल्ली अरूण जेटली मैदानात प्लेऑफ आणि अंतिम फेरीचं नियोजन केलं जाईल. बीसीसीआयने इतर ठिकाणींची देखील चाचपणी केली आहे. मुंबई ऐवजी इतर ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्याचा मानस होता. गुजरात सामने भरवण्याचा पर्याय निवडला गेला होता. पण अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम सामन्यांसाठी मोठं वाटलं. त्यानंतर दिल्ली आणि बंगळुरुची निवड केल्याचं बोललं जात आहे.

वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातही 22 सामने खेळले जातील. साखळी फेरीत एकूण 20 सामने खेळले जातील. त्यातील टॉपला असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत स्थान मिळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरी संघाला अंतिम फेरीसाठी लढत द्यावी लागेल. मुंबई इंडियन्सने गेल्यावर्षी जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदा जेतेपदावर कोण नाव कोरतं? याची उत्सुकता आहे.

दुसरीकडे, आयपीएल 2024 स्पर्धेसाठीच्या तारखांचा घोळ कायम आहे. आयपीएलसाठी दहा संघ सज्ज असून स्पर्धा भारतातच आयोजित केली जाईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल. पण लोकसभा निवडणुका असल्याने ठिकाणं निवडताना संभ्रम आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही कारवाँ मॉडेल असेल असं सांगण्यात येत आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.