WPL 2024, DC vs MI : 209 च्या स्ट्राईक रेटने जेमिमा रॉड्रिग्सने केली धुलाई, मुंबईसमोर मोठं आव्हान

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 12व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. दिल्लीत सामना असल्याने कॅपिटल्सला प्रेक्षकांची पूर्ण साथ मिळाली. या वातावरणाचा फायदा दिल्लीच्या फलंदाजांना झाला. त्यामुळेच 20 षटकात 4 गडी गमवून 192 धावा केल्या. या सामन्यात जेमिमाचं वादळ प्रेक्षकांना अनुभवता आलं.

WPL 2024, DC vs MI :  209 च्या स्ट्राईक रेटने जेमिमा रॉड्रिग्सने केली धुलाई, मुंबईसमोर मोठं आव्हान
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 9:23 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वाचा सामना सुरु आहे. या स्पर्धेतील विजय दोघांपैकी एका संघाला टॉपला ठेवणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांची विजयासाठी धडपड सुरु आहे. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. ठरल्याप्रमाणे मुंबईने दव फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून गोलंदाजी स्वीकारली. पण दिल्लीला होम ग्राउंडचा फायदा असल्याचं विसरून गेले. पहिल्या चेंडूपासून दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक सुरुवात केली. शफाली वर्माने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून धावांचा नारळ फोडला. कारण दुसऱ्या डावात गोलंदाजांना गोलंदाजी करणं अवघड होतं म्हणून मोठी धावसंख्या करणं गरजेचं होतं. त्यानुसार फलंदाजांनी आडवा पट्टा मारण्यात कोणतीच कसर सोडली नाही. मेग लेनिंगने 38 चेंडूत 53 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर प्रेक्षकांना जेमिमाचं वादळ पाहायला मिळालं.

जेमिमा रॉड्रिग्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 209.9 च्या स्ट्राईक रेटने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. 33 चेंडूत 69 धावांची खेळी केली. जेमिमाच्या आक्रमक खेळीमुळे मुंबईचे गोलंदाज पुरते हैराण झाले होते. तिला बाद करण्यासाठी हवं ते केलं. पण जेमिमा या सर्वांना उरून पुरली. तिने 3 उत्तुंग षटकार आणि 8 चौकार ठोकले. या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला 4 गडी गमवून 20 षटकात 192 धावांपर्यंत मजल मारता आली. जेमिमा शेवटपर्यंत नाबाद राहिली.

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, एस सजना, अमनजोत कौर, हुमैरा काझी, सायका इशाक, शबनीम इस्माईल.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, तीतास साधू, शिखा पांडे, राधा यादव.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.