WPL Final, DC vs RCB : शफाली वर्माचं दिल्लीत वादळ! अंतिम सामन्यात षटकार चौकाराचा धूमधडाका

वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी निवडली. मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा या जोडीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला बॅकफूटवर ढकललं. या सामन्यात शफाली वर्माने आक्रमक खेळी केली.

WPL Final, DC vs RCB : शफाली वर्माचं दिल्लीत वादळ! अंतिम सामन्यात षटकार चौकाराचा धूमधडाका
WPL Final, DC vs RCB : शफाली वर्माकडून षटकारांचा वर्षाव, अंतिम फेरीत आक्रमक खेळी
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 8:35 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सच्या शफाली वर्माचं वादळ दिसलं. आक्रमक फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. मेग लॅनिंग आणि शफाली वर्माने अर्धशतकी खेळी केली. यात एकट्या शफाली वर्माच्या 40 धावा होत्या. सुरुवातीला शफाली वर्माने 200 च्या स्ट्राईक रेटने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांना धू धू धूतलं. शफाली वर्माचं अर्धशतक अवघ्या 6 धावांनी हुकलं. शफाली वर्माने 27 चेंडूत 44 धावा केल्या. शफाली वर्माने 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. शफाली वर्मा बाद झाली तेव्हा तिचा स्ट्राईक रेट 162.96 इतका होता. मोलिनेक्सच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला. मात्र सीमारेषेवर असलेल्या वारेहमने चूक केली नाही आणि झेल पकडला. शफाली वर्माने या स्पर्धेत एकूण 20 षटकार ठोकले आहेत. अंतिम सामन्यापूर्वी शफाली वर्माच्या नावावर 17 षटकार होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 3 षटकार मारताच 20 आकडा गाठला आहे.

नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. मेग लॅनिंगने तात्काळ फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही अंशी खरा ठरला. पण शफाली वर्माची विकेट पडताच दिल्लीचा डाव आपटला. सोफी मोलिनक्सने एकाच षटकात तीन गडी बाद करत दिल्लीला बॅकफूट ढकललं. दिल्लीच्या 64 धावांवर बिनबाद अशी स्थिती होती. पण सोफी मोलिनक्सच्या गोलंदाजीवर ही स्थिती 3 बाद 64 अशी झाली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.