WPL 2024, DC vs UPW : युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 15 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले आहे. युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. दिल्लीने आजचा सामना जिंकला तर टॉप थ्रीमधील स्थान पक्कं होईल. तर युपीला जर तरच्या गणितावर अवलंबून राहावं लागेल.

WPL 2024, DC vs UPW :  युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन
WPL 2024, DC vs UPW : टॉस जिंकत दिल्लीने घेतली फलंदाजी, दोन्ही संघांची प्लेइंगबाबत जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 7:10 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात सामना होत आहे. एक दिवस आधीच युपी वॉरियर्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्या धक्क्यातून सावरत नाही तोच दिल्लीचं आव्हान आहे. त्यामुळे आता मागचं सारं काही विसरून पुन्हा एकदा जोमाने उभं राहावं लागणार आहे. युपी वॉरियर्सने मध्यंतरी चांगली सुरुवात केली होती. पण पुन्हा एकदा गाडी रुळावरून घसरली आहे. त्यामुळे टॉप थ्रीमध्ये स्थान मिळवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. तर दिल्लीने आजचा सामना जिंकला तर टॉप थ्रीमधील स्थान जवळपास पक्कं होणार आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला. दिल्लीत वातावरणात प्रथम फलंदाजी मानवत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे बंगळुरुत प्रथम गोलंदाजी आणि दिल्लीत प्रथम फलंदाजी असा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यानुसार युपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी निवडली आहे. आता दिल्लीसमोर मोठं आव्हान ठेवण्यासाठी धडपड असणार आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर एलिसा हिलीने सांगितलं की, “आज आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. काल रात्री या विकेटवर खेळलो, आशा आहे की आम्ही त्यातून धडा घेऊ. आम्हाला माहीत आहे की आम्हाला शेवटचे दोन सामने जिंकायचे आहेत. आम्ही दिल्लीला हरवलेले नाही. संघात दोन बदल केले आहेत.”

दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने सांगितलं की, “आम्हाला माहित आहे की प्रत्येक संघ जिंकण्यास सक्षम आहे. आम्हाला आज चांगले खेळायचे आहे, आमच्यासाठी एक चांगले आव्हान आहे.खेळपट्टी वाजवीपणे ठीक दिसत होती, वेगवान आउटफिल्ड आहे. संघात एक बदल केला आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, उमा चेत्री, गौहर सुलताना, सायमा ठाकोर.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, तितास साधू

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.