WPL Final, DC vs RCB : नाणेफेकीचा कौल जिंकत दिल्लीने घेतली फलंदाजी, अशी असेल प्लेइंग 11

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आहेत. मुंबई इंडियन्सनंतर आता नवा विजेता वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला.

WPL Final, DC vs RCB : नाणेफेकीचा कौल जिंकत दिल्लीने घेतली फलंदाजी, अशी असेल प्लेइंग 11
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 7:13 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा थरार आता अंतिम फेरीत येऊन पोहोचला आहे. आतापर्यंत झालेल्या 21 सामन्यात रोमांचक सामन्यांची अनुभूती प्रेक्षकांना मिळाली. पाच संघांपैकी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता या दोन संघांपैकी कोण बाजी मारतं याची उत्सुकता लागून आहे. पहिल्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला होता. हा सामना मुंबई इंडियन्सने जिंकत पहिल्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत नवा विजेता मिळणार आहे. आता हा विजेता कोण असेल हे पुढच्या काही तासात स्पष्ट होईल. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.

दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने सांगितलं की, “आम्ही आज प्रथम फलंदाजी करू, खेळ जिंकण्याची हीच सर्वोत्तम संधी आहे. खेळपट्टी चांगली दिसते आणि आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. यापूर्वी जे घडले ते अप्रासंगिक आहे, आम्ही एका चांगल्या संघाविरुद्ध उभे आहोत आणि आम्हाला चांगले खेळण्याची गरज आहे. आम्ही आहे त्याच टीमसोबत जात आहोत ”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली की, “आम्ही टॉस जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजी केली असती. पण असं बोलणं आता बरोबर नाही. आम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, आमच्या प्लानवर टिकून राहावे लागेल. आत्तापर्यंत खूप चढ-उतार आले आहेत, परंतु आज आम्हाला सर्वोत्तम करण्याची गरज आहे. याच विकेटवरील हा चौथा सामना आहे, शेवटचा सामना संथ खेळला गेला. आमच्या संघात एक बदल आहे. मेघना संघात परतली आहे.”

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चार वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चारही सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरुला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचं पारडं जड आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या काही खेळाडूंचा फॉर्म पाहता सामना वाटतो तितका सोपा जाणार नाही. दिल्लीच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणण्याची क्षमता बंगळुरुच्या खेळाडूंमध्ये आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.