WPL 2024, GG vs RCB : गुजरातचा स्पर्धेत पहिला विजय, बंगळुरुला पराभूत केल्याने गुणतालिकेत मोठी उलथापालथ

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 13 व्या सामन्यात गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचं पाणी पाजलं. या निकालामुळे गुणतालिकेत टॉप 3 साठी चुरस वाढली आहे. टॉप 3 मध्ये जागा मिळवण्यासाठी गुजरातही रेसमध्ये आला आहे.

WPL 2024, GG vs RCB : गुजरातचा स्पर्धेत पहिला विजय, बंगळुरुला पराभूत केल्याने गुणतालिकेत मोठी उलथापालथ
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 10:59 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत गुजरात जायंट्सने मागच्या सलग चार पराभवांचा वचपा काढला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच आक्रमकपणे फलंदाजी करत बंगळुरुच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. गुजरात जायंट्सने 20 षटकात 7 गडी गमवून 199 धावा केल्या आणि विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. पण बंगळुरुला इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करणं कठीण गेलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 8 गडी गमवून 180 धावा केल्या. त्यामुळे बंगळुरुचा 19 धावांनी पराभव झाला. गुजरातची कर्णधार बेथ मूनी आणि लॉरा वॉल्वार्ड्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 199 धावांवर मजल मारता आली. बेथने 51 चेंडूत 85 धावांची खेळी केली. तर वॉल्वार्ड्टने 45 चेंडूत 76 धावा ठोकल्या.

विजयी धावांचा पाठलाग करताना बंगळुरुची सुरुवात हवी तशी शाली नाही. संघाच्या 31 धावा असताना पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्मृती मंधाना बाद झाली. त्यानंतर सभनेनी मेघाना 4 धावांवर असताना रनआऊट झाली. तिच्या धीम्या खेळीने धावांचं अंतर वाढलं हे देखील तितकंच खरं आहे. एलिसा पेरीने 24, सोफी डेव्हाईनने 23, रिचा घोषने 30, जॉर्जिया वारेहमने 48 धावांची खेळी केली. पण आक्रमक अशी खेळी काही कोणाकडून झाली नाही. त्यामुळे विजयी धावांचं षटकांमागे वाढतच गेलं. अखेर 19 धावा कमी पडल्या आणि पराभव सहन करावा लागला.

या पराभवामुळे गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. गुजरातने हा सामना जिंकल्याने स्पर्धेती आव्हान कायम ठेवलं आहे. तर टॉप थ्रीसाठी आता पाच संघांमधली चुरस कायम असणार आहे. पुढचे तीनही सामने गुजरातने जिंकले तर टॉप थ्री गाठू शकते. तर युपी वॉरियर्सचा प्रवासात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे इथून पुढे एकही सामना गमवला तर चित्र पालटू शकते.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), लॉरा वोल्वार्ड, फोबी लिचफील्ड, वेदा कृष्णमूर्ती, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, मेघना सिंग, मन्नत कश्यप, शबनम मोहम्मद शकील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सभिनेनी मेघना, स्मृती मंधाना (कर्णधार), एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी डेव्हाईन, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.