WPL 2024, MI vs DC : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने मन केलं मोकळं, म्हणाली..

वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना दिल्लीच्या पारड्यात होता. पण उत्तुंग षटकार ठोकत सामना आपल्याकडे झुकवला. या विजयानंतर हरमनप्रीत कौर हीने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

WPL 2024, MI vs DC : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने मन केलं मोकळं, म्हणाली..
WPL 2024, MI vs DC : मुंबई इंडियन्सची विजयाचा शिल्पकार कोण? हरमनप्रीतने श्रेय देताना बरंच काही सांगितलं
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 12:01 AM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 171 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. मुंबईला शेवटच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना एस सजना हीने उत्तुंग षटकार ठोकला. त्यामुळे दिल्लीचा मागचा पराभवाचा वचपा काढणं स्वप्नच राहिलं. या सामन्यात मुंबईकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटिया यांनी दमदार कामगिरी केली. दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून एस सजना सर्व क्रेडीट नेलं. पण सामन्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने भलत्यालाच दिलं. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच आहे.

“शेवट खूपच गोड झाला. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्यामुळे खरोखर आनंद झाला. याचे श्रेय मला माझे फलंदाजी प्रशिक्षक हिमांशू भैया यांना द्यायला आवडेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर माझ्यात आत्मविश्वास नव्हता, त्याने माझ्याकडून कठोर सराव करून नवीन ऊर्जा दिली. मी देशांतर्गत क्रिकेट खेळत नव्हते, मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होते. मानसिकदृष्ट्या त्या ब्रेकने मला मदत केली. फलंदाजी करताना विकेट चांगली दिसत होती, आम्ही विचार केला की आम्ही खेळ खोलवर नेला तर आम्हाला वाटले की आम्ही जिंकू शकू.”

“सजना सराव सत्रात षटकार मारत होती आणि तिने आज रात्री आम्हाला ते करून दाखवले. आम्ही पहिल्या 3 चेंडूत खेळ संपवू पाहत होतो पण आम्हाला माहित आहे की आमच्या फलंदाजीमध्ये डेप्थ आहे. सजना होती म्हणून टेन्शन नव्हतं, त्यामुळेच मी इथे उभी आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या फलंदाजीने काही फरक पडत नाही, फक्त परिस्थिती महत्त्वाची असते आणि त्यानुसार आपण काम करतो.”, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्ज, मारिझान कॅप, एनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.